शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST

महापौरांचा निर्णय, कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासंदर्भात घेतला आढावा, इयत्ता दहावी, बारावीच्या वर्गांना सूट अमरावती : शहरात कोरोना संसर्गाचा वाढता ...

महापौरांचा निर्णय, कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासंदर्भात घेतला आढावा, इयत्ता दहावी, बारावीच्या वर्गांना सूट

अमरावती : शहरात कोरोना संसर्गाचा वाढता आलेख बघता प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहील, असा निर्णय महापौर चेतन गावंडे यांनी गुरूवारी घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी १३ फेब्रुवारीपासून सुरू करावी, असे निर्देश शिक्षणाधिकारी यांना दिलेत.

शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार वाढत आहे. कोविड- १९ आजाराबाबत महानगरपालिका परिक्षेत्रात दक्षता घेण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांसाठी गुरुवारी महापौर चेतन गावंडे यांच्‍या अध्‍यक्षतेत आढावा बैठक पार पडली. यावेळी कोरोना संसर्ग आणि वाढत्या रूग्णांबाबत मंथन करण्यात आले. दरम्यान शाळा सुरू असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. हल्ली महापालिका क्षेत्रातील शासकीय, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित अशा एकाही शाळेत विद्यार्थी संक्रमित आढळले नाही. मात्र, कोरोना संक्रमणाची स्थिती लक्षात घेता शाळांमध्ये गर्दी झाल्यास विद्यार्थी पॉझिटिव्ह निघू शकतात, असे धाेक्याचे संकेत आरोग्य यंत्रणेने आढावा बैठकीत दिले. त्यामुळे महापौर गावंडे यांनी महापालिका परिक्षेत्रातील शाळा १३ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत वर्ग १० आणि १२ वी वगळून इतर वर्गासाठी शाळा बंद ठेवण्‍याचे ठरविले.

या बैठकीला उपमहापौर कुसुम साहु, स्‍थायी समिती सभापती राधा कुरील, आयुक्‍त प्रशांत रोडे, सभागृह नेता सुनील काळे, नगरसेवक विलास इंगोले, प्रकाश बनसोड, तुषार भारतीय, सहायक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, नंदकिशोर तिखिले, वैद्यकीय अधिकारी (स्‍वच्‍छता) सीमा नेताम, शिक्षणाधिकारी अब्‍दुल राजीक, पशुशल्‍य चिकित्‍सक सचिन बोंन्‍द्रे, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, जयश्री नांदुरकर, मानसी मुरके, अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्‍तरमारे, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्‍हाण उपस्थित होते.

----------

हे सुद्धा झाले निर्णय

- कोरोना नियमावलींचे पालन करण्यासाठी दंडात्मक कारवाईला वेग

- अतिक्रमण विभाग, बाजार व परवाना विभाग व पशुशल्‍य विभागाचे स्वतंत्र पथक

- बाजारपेठेत नियमांचे पालन न करणारे प्रतिष्ठाने सील करावे

- एसटी, ऑटोरिक्षा चालकांना मास्‍क वापराची सक्‍ती

- मंगल कार्यालय संचालकांनी पालन करावे

- कोरोना रुग्ण तपासणीला वेग

---------------