शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘आलिया’ अंगावर... !

By admin | Updated: June 27, 2016 00:02 IST

अवघ्या २२६८ कोटी रूपयांमधून अमरावती शहर ‘स्मार्ट’ करण्याचा आशावाद व्यक्त करीत ‘आलिया कन्सलटन्सी’ने स्मार्ट सिटीच्या फेरप्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.

स्मार्ट सिटी : २,२६८ कोटींचा फेरप्रस्ताव वादातअमरावती : अवघ्या २२६८ कोटी रूपयांमधून अमरावती शहर ‘स्मार्ट’ करण्याचा आशावाद व्यक्त करीत ‘आलिया कन्सलटन्सी’ने स्मार्ट सिटीच्या फेरप्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. तत्कालीन आयुक्तांनी नकाराची फुली मारल्यानंतर ‘आलिया’ कंपनीच्या पुनर्निवडीमुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. पुन्हा ‘आलिया’च का, याबाबत मात्र प्रशासनाला उत्तर देता आलेले नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अमरावती महापालिका सहभागी झाली. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव बनविण्यासाठी ‘आलिया’ कन्सलटन्सी या खासगी कंपनीशी करार करण्यात आला. ‘प्रस्ताव कम डीपीआर’ बनविण्यासाठी ‘आलिया’ कन्सल्टन्सीला सुमारे ९० लाख रूपये मोबदला द्यावयाचे ठरले. मात्र, १० लाख रूपयांचा अ‍ॅडव्हान्स घेऊनही आलिया कन्सल्टंसीने काम सुरू करण्यास लेटलतिफी केली. तत्कालीन आयुक्तांनी महापालिकेतील यंत्रणेचा आधार घेत ‘आलिया’ कन्सलटन्सीच्या माध्यमातून कसाबसा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाकडे पाठविला. तो प्रस्ताव स्पर्धेत टिकू शकला नाही आणि अमरावती शहराचा स्मार्ट सिटी स्पर्धेत समावेश होऊ शकला नाही. ‘आलिया’ कन्सलटन्सीने या स्पर्धेसाठी तब्बल ५५०० कोटी रूपयांचा प्रस्ताव बनविला होता, हे विशेष. स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात समावेश होऊ न शकलेल्या शहरांना पुन्हा त्रुटीरहित फेरप्रस्ताव पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या.डीपीआरची किंमत अर्ध्यावरच आलिया कन्सलटन्सीने अमरावतीचे स्मार्ट सिटीचे स्वप्न ५५०० कोटी रुपयांमध्ये साकारण्याचा दावा पहिल्या टप्प्यात केला होता. त्या प्रस्तावात ग्रीनफिल्ड मॉडेल साकारण्यात आले होते. देशातील ९८ शहरांपैकी बोटावर मोजण्याइतपत शहरांनी ग्रीनफिल्ड मॉडेल साकारुन प्रस्ताव दाखल केला होता.त्यामुळे अमरावतीसारख्या छोट्या शहराचा हा प्रस्ताव पहिल्या टप्प्यात टिकू शकला नाही, असे त्यावेळी सांगण्यात आले.त्यामुळे आता आलिया कन्सलटन्सीने ग्रीनफिल्ड मॉडेलसह रेट्रोफिटींग,रिडेव्हलपमेंट आणि पॅनसिटीचा नव्याने समावेश केला आहे. मात्र, किंमत वाढण्याऐवजी कमी करण्यात आल्याने या प्रस्तावाच्या सर्वसमावेशकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.