शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणाऱ्या अजिंक्यला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणारा आरोपी अजिंक्य सिनकर याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रविनगरातून अटक केली. घटनेनंतर तो यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे त्याच्या घरी गेला होता. प्रेमप्रकरणातून हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

ठळक मुद्देविधी महाविद्यालय : पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणारा आरोपी अजिंक्य सिनकर याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रविनगरातून अटक केली. घटनेनंतर तो यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे त्याच्या घरी गेला होता. प्रेमप्रकरणातून हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याच्या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. महाविद्यालयीन विद्यार्थिनींमध्ये या घटनेमुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, घटनेनंतर पसार झालेल्या अजिंक्यचा शोध गाडगेनगर पोलीस घेत होते. पोलीस आपल्या मागावर असतील, या भीतीपोटी तो यवतमाळ जिल्ह्यातील महागावला गेला होता. पोलिसांनी अंजिक्यच्या वडिलांशीही संपर्क करून त्याची माहिती घेतली. यादरम्यान पोलिसांनी अजिंक्यच्या मित्रांची चौकशी केली. अजिंक्य न्यायालयात येणार असल्याचे पोलिसांना कळले होते. तत्पूर्वी, तो रविनगरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी अजिंक्यच्या मित्राला विश्वासात घेऊन त्याच्याशी संपर्क साधावयास लावला. त्याला अमरावतीत बोलावून घेतले. त्यानंतर पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर, पोलीस हवालदार अहमद अली, भारत वानखडे, प्रशांत दि. वानखडे, प्रशांत व. वानखडे यांनी रविनगर परिसरात सापळा रचून अजिंक्य सिनकरला ताब्यात घेतले. गाडगेनगर पोलिसांनी त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने अजिंक्यला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.आरोपी अजिंक्य यवतमाळ जिल्ह्यातील महागावला त्याच्या घरी गेला होता. त्याच्या मित्रांना विश्वास घेऊन त्याच्याबाबत माहिती काढली. यानंतर अमरावतीला बोलावून रविनगरातून अटक केली.- मनीष ठाकरेपोलीस निरीक्षक, गाडगेनगर.

टॅग्स :collegeमहाविद्यालयPoliceपोलिस