शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

पापळला येत्या सत्रापासून कृषी महाविद्यालय

By admin | Updated: April 11, 2017 00:27 IST

कृषी व शिक्षण क्षेत्रात जगात ज्यांची महामानव म्हणून ओळख आहे अशा डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे पुढील सत्रापासून कृषी महाविद्यालय सुरू होईल, ...

कृषिमंत्री फुंडकर यांची घोषणा : डॉ.पंजाबराव देशमुख पुण्यतिथी सोहळा, पंचाहत्तरी पार केलेल्या सभासदांचा सन्मानअमरावती : कृषी व शिक्षण क्षेत्रात जगात ज्यांची महामानव म्हणून ओळख आहे अशा डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे पुढील सत्रापासून कृषी महाविद्यालय सुरू होईल, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केली. डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या ५२ व्या पुण्यतिथी सोहळ्यात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांचा ५२ वा पुण्यतिथी सोहळा श्री शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळा मेन ब्रन्च येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके हे होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, सुरेश ठाकरे, कोषाध्यक्ष ह. भा. ठाकरे, सचिव वि.गो. भांबुरकर, कार्यकारिणी सदस्य गजाननराव पुंडकर, जगन्नाथ वानखडे, प्रा. अरुण सांगोळे, प्राचार्य व्ही. जी. ठाकरे, आर. आर. सावरकर, अरुण मंगळे व श्रीमती कमलताई गवई यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. शेळके यांनी आपल्या १० वर्षांच्या विकासात्मक कार्याचा आढावा वाचला. फुंडकरांनी कृषी महाविद्यालयाची घोषणा करून ताबडतोब अंमलबजावणी केल्यामुळे शेळके यांनी आभार मानले. ७५ वर्षे पूर्ण केलेल्या आजीवन सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तीन नवीन इमारतींचे उद्घाटन फुंडकरांच्या हस्ते झाले. यामध्ये ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर, शिवाजी विज्ञान महाविद्यालय सर व्ही. व्ही. रमण सभागृह व शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचा समावेश आहे. प्रास्ताविक उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, संचालन किशोर फुले व आभार प्रदर्शन सचिव वि.गो. भांबुरकर यांनी केले. कार्यक्रमाला शिव परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.