‘न्हाइ’च्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध वनगुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:47 AM2018-02-16T01:47:16+5:302018-02-16T01:48:02+5:30

वरूड वनपरिक्षेत्र हद्दीतील पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणात राखीव, संरक्षित क्षेत्रातील सुमारे ३०९ वृक्ष अवैधरीत्या कापल्याप्रकरणी अकोला येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय - न्हाइ) चे कार्यकारी अभियंता आर.बी. झाल्टे यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविला आहे.

Against the executive engineer of NAIE | ‘न्हाइ’च्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध वनगुन्हा

‘न्हाइ’च्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध वनगुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देराखीव वनातील अवैध वृक्षकटाई: ४५ लाखांचे लाकूड जप्त; पर्यावरण परवानगीला खो

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: वरूड वनपरिक्षेत्र हद्दीतील पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणात राखीव, संरक्षित क्षेत्रातील सुमारे ३०९ वृक्ष अवैधरीत्या कापल्याप्रकरणी अकोला येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय - न्हाइ) चे कार्यकारी अभियंता आर.बी. झाल्टे यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविला आहे. हे वृक्ष कापताना पर्यावरण खात्याची परवानगी घेण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वरूड-पांढुर्णा हा रस्ता राखीव वनांतून जात असला तरी रस्त्याचा उजवा भाग हा सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ताब्यात दिला आहे. मात्र, वृक्षांची मालकी ही वनविभागाची आहे. असे असताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राखीव, संरक्षित क्षेत्रातील ३०९ झाडे अवैधरीत्या कापली आहेत. ही बाब वरूड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच कार्यकारी अभियंता झाल्टे यांच्याविरुद्ध १६ जानेवारी रोजी प्राथमिक वनगुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून इमारती, बल्ली, जळाऊ असे एकूण ८९ घनमीटर सागवान लाकूड जप्त केले आहे. त्याचे बाजारमूल्य ८९ लाख रुपये असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. महामार्गालगत वृक्षाचे मूल्यांकन व मोजणी वनविभागाने केली. त्यानंतर वृक्षाचे मूल्यनिर्धारण करण्यात आले. त्यानुसार त्याच परिक्षेत्रातून वृक्ष कापण्याची परवानगी दिली गेली. मात्र, वृक्ष कापण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर पुसला- चांदुरी मार्ग राखीव वनांतून जात असल्याचे वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार वृक्ष कापण्यात आलेल्या घटनास्थळाचे वनविभागाने नकाशे तपासले. मोजणीसाठी पीडीए यंत्र असताना अवैधरीत्या वृक्ष कापल्याचे वनाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊ नये, ही बाब आर्श्चयकारक मानली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते निर्मिती कंत्राटदारांना कशाच्या आधारे राखीव वनक्षेत्रातून वृक्ष कापण्याची परवानगी दिली, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

वनअधिनियम संवर्धन तरतुदीचा भंग...: वरूड-पांढुर्णा या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणास प्रारंभ करण्यापूर्वी राखीव वनक्षेत्रातील वृक्ष अवैधरीत्या कापण्यात आल्याप्रकरणी वनसंवर्धन अधिनियम १९८०, भारतीय वनअधिनियम १९२७ आणि जैवविविधता अधिनियम २००२ मधील अनेक तरतुदींचे उल्लंघन झाले आहे. मात्र, न्हाइच्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविताना भारतीय वन अधिनियमांचा उलेख करण्यात आलेला नाही.

वरुड-पांढुर्णा महामार्ग सिमेंट काँक्रीटीकरणात काही वृक्ष कापल्याप्रकरणी प्राथमिक वनगुन्हा नोंदविला आहे. वनविभागाने तसे कळविले असून, कापल्या गेलेल्या वृक्षांची हद्दीची मालकी स्पष्ट करण्याचे सांगितले आहे.
- आर.बी. झाल्टे
कार्यकारी अभियंता,
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अकोला.

Web Title: Against the executive engineer of NAIE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.