शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

By admin | Updated: January 3, 2017 00:14 IST

शालार्थ वेतनप्रणाली अंतर्गत शिक्षकांची नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांची वेतनदेयके विलंबाने सादर केल्याप्रकरणी ....

सीईओंचे आदेश : कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल अमरावती : शालार्थ वेतनप्रणाली अंतर्गत शिक्षकांची नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांची वेतनदेयके विलंबाने सादर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी ३० डिसेंबर रोजी दर्यापूर व चांदूररेल्वे पंचायत समितीमधील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. ही कारवाई अन्यायकारक असल्याने या विरोधात सोमवारी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाची दखल घेत सीईओंनी दर्यापूर पं.स.मधील पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन आदेश मागे घेतले. आहेत. यामध्ये कनिष्ठ सहायक राहुल प्राणकर, वरिष्ठ सहायक पी.एस.साखरे, वरिष्ठ सहायक व्ही.बी.देशमुख तर चांदूररेल्वे पं.स.मधील कनिष्ठ सहायक अनिल राऊत व कनिष्ठ सहायक अरविंद चिंचमलातपुरे या पाच निलंंबित कर्मचाऱ्यांची अ‍ॅडिशनल सीईओ प्रकाश तट्टे यांच्यामार्फत सुनावणी घेतली. पाचही कर्मचाऱ्यांनी यावेळी भविष्यात अशी चूक न करण्याचे मान्य केले तसेच वेतनाच्या कामात दिरंगाई होणार नाही, अशी हमी दिल्याने सीईओ किरण कुलकर्णी यांनी एका लेखी आदेशाव्दारे दर्यापूर व चांदूररेल्वे या दोन पंचायत समितींमधील पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. तसेच यापाचही कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या ठिकाणी स्थापित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे सोमवारी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांच्या नेतृत्वात डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे यांना निलंबन मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते. कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला होता. अखेर निलंबन आदेश मागे घेण्याचे आदेश मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, सचिव संजय राठी, कार्याध्यक्ष संजय येवतकर, उपाध्यक्ष अविनाश हुसे, कोषाध्यक्ष शिल्पा काळमेघ, संघटक समीर चौधरी, ज्ञानेश्वर घाटे, मंगेश मानकर, श्रीकांत मेश्राम, प्रशांत धर्माळे, अमोल कावरे, लिलाधर नांदे, समीर लेंडे, नीलेश तालन सहभागी झाले होते.