शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर वसुलीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By admin | Updated: December 11, 2015 00:39 IST

महापालिका उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी प्रशासनाने कर वसुलीचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे.

विशेष शिबिर : ३१ डिसेंबरनंतर कर भरल्यास दरमहा दोन टक्के व्याजअमरावती : महापालिका उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी प्रशासनाने कर वसुलीचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. मार्च अखेरपर्यंत ४४ ते ४५ कोटी रुपये मालमत्ता कराचे वसूल होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.महापालिका अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे ५० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र १० डिसेंबरपर्यत मालमत्ता करातून १२.५० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहे. मालमत्ता कराची वसुली वाढविण्यासाठी मुल्य निर्धारक व कर संकलन विभागाने पाचही झोन निहाय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरात दीड लाख मालमत्ता असून थकीत करदात्यापर्यंत कर वसुली लिपीक पोहचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. डिसेंबरनंतर मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी सुटीच्या दिवशी विशेष शिबीर, कर भरण्यासाठी आॅनलाईन सुविधा, किआॅक्स मशीनवर कर भरण्याची सोय, कर लिपीक नागरिकांच्या दारी उपक्रम, भ्रमणध्वनीवर कॉल करा आणि कर भरा अशा विविध उपक्रमातून नागरिकांपर्यत पोहचण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. डिसेंबर अखेरपर्यत नागरिकांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा करावा, यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यात कर वसुलीसाठी जोरकसपणे प्रयत्न करुन बजेटमध्ये तरतुदीनुसार कर वसुलीवर भर राहणार आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या नवीन आणि अतिरिक्त मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या मालमत्तांवर दंडात्मक कारवाई ६ पट कर आकारणी करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. मात्र सभागृहात सहापट कर आकारणीबाबत एकमत झाले नाही, हे विशेष. तरिदेखील प्रशासनाकडून सहापट दंडात्मक कर वसूल केला जात आहे.