शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

देश-विदेशात जातो ‘अचलपुरी संत्रा’

By admin | Updated: December 11, 2015 00:37 IST

नागपूरची ओळख ठरणारा संत्रा आता अचलपूरमध्येही बाजारपेठ ठरूलागला आहे. विदेशात बंदी, केरळमध्ये रबर उत्पादनात ...

पाच महिन्यांत सहा हजार मजुरांना रोजगार : बांग्लादेशात शासकीय तंत्रामुळे गेला नाही संत्रा नरेंद्र जावरे परतवाडा नागपूरची ओळख ठरणारा संत्रा आता अचलपूरमध्येही बाजारपेठ ठरूलागला आहे. विदेशात बंदी, केरळमध्ये रबर उत्पादनात आलेली मंदी आणि मोठ्या प्रमाणात झालेले उत्पन्न पाहता संत्र्याला हवे तसे भाव नसताना अचलपूर तालुक्यातील जवळपास ४० संत्रा मंडईतून सहा हजारांवर मजुरांना सलग पाच महिने चांगल्या वेतनासह रोजगार मिळाला आहे. अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आता संत्रा उत्पादन घेतले जात आहे. मागील दहा वर्षांत सर्वाधिक बंदी यावर्षी संत्रा उत्पादनावर आली आहे. अचलपूर-परतवाडा शहराच्या चारही बाजूने जलसिंचन प्रकल्प असल्याने पाण्याच्या बाबतीत श्रीमंत असा हा तालुका आहे. परिणामी संत्रा, केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. ४० मंडई, सहा हजार मजूर अचलपूर तालुक्यात जवळपास ४० संत्रामंडई या वर्षी लावण्यात आल्या होत्या. त्यापैकी अंजनगाव, चिखलदरा, मल्हारा रस्त्यावर तब्बल २२ मंडई होत्या. या संत्रामंडईतूनच देश विदेशातील बाजारपेठेत संत्रा पोहोचविला जातो. हा संत्रा पोहोचविण्यासाठी जवळपास पाच महिने सहा हजारांवर अधिक मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती संत्रा उत्पादक राजेंद्र गोरले यांनी दिली. अचलपूर तालुक्यातील १७२ पैकी १६५ गावात संत्रा पीक घेतले जाते. त्यामध्ये मल्हारा, एकलासपूर, धामणगाव गढी, धोतरखेडा, गौलखेडा बाजार, हनवतखेडा, वडगंव फत्तेपूर, परसापूर, कविठा या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन घेतले जातात. कृषी विभागाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ६४,६३० हेक्टर एकूण अचलपूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र आहे.