अचलपूर पोलिसांकडून अट्टल चोरास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:12 IST2021-05-09T04:12:52+5:302021-05-09T04:12:52+5:30

परतवाडा येथील जयस्तंभ चौक येथून अचलपूर पोलिसांनी त्याला पळताना अटक केली. रमेश दीपचंद चंदेले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अन्नपूर्णा माता ...

Achalpur police arrest Attal Choras | अचलपूर पोलिसांकडून अट्टल चोरास अटक

अचलपूर पोलिसांकडून अट्टल चोरास अटक

परतवाडा येथील जयस्तंभ चौक येथून अचलपूर पोलिसांनी त्याला पळताना अटक केली. रमेश दीपचंद चंदेले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अन्नपूर्णा माता फौजी रिफ्रेशमेंट हॉटेलचे अज्ञात इसमाने शटरचे कुलूप तोडून हॉटेलमधील केबल वायर, दोन प्लास्टिक खुर्ची, सिलिंडर असा एकूण १८ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेला. या गुन्ह्याचा तपास करताना अचलपूर पोलिसांनी गोपनीय माहितीवरून परतवाड्यातील जयस्तंभ चौकातून आरोपी शेख इब्राहिम याला पळून जात असताना अटक केली. आरोपीने सदर चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून १६ हजार २०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अब्दागिरे, अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात डीबी स्कॉडचे पुरुषोत्तम बावनेर, विशाल थोरात, विलास सोनवणे, शेख मुजफ्फर यांनी केली.

Web Title: Achalpur police arrest Attal Choras