शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

अचलपुरात सहकार क्षेत्रातील निवडणुकीची रणधुमाळी

By admin | Updated: January 6, 2015 22:52 IST

तालुक्यातील विविध गावांतील २८ सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकांना सुरूवात झाल्याने सहकार विभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकाही रंगात आल्या आहेत.

अचलपूर : तालुक्यातील विविध गावांतील २८ सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकांना सुरूवात झाल्याने सहकार विभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकाही रंगात आल्या आहेत. त्यासाठी निवडणुकांची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे.
या महिन्यात वेगवेगळ्या टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. शहरासह तालुक्यातील परसापूर, वडनेर, भूजंग, धामणगाव गढी, रासेगाव, श्यामपूर, अंबाडा, बोरगाव, अचलपूर, प्रागतिक हायस्कूल, जगदंब सह कर्मचारी पतसंस्था, जगदंब विद्यार्थी सहकारी भंडार, म्युनिसिपल क्रेडिट कर्मचारी सो. सा. विद्युत कामगारांसह पतसंस्था, इत्यादी ठिकाणची जबाबदारी व्ही.ए.पांडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जानेवारीअखेर निवडणुका
जी.एन. डिके यांच्याकडे चमकखुर्द, धोतरखेडा, कुष्ठा येथील दोन संस्था, कांडली पोही, सालेपूर, एकलासपूर येथील निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गडलिंग यांच्याकडे रामानंद, बोपापूर, देवगाव, जवर्डी, केशवानंद, सावळापूर, भूगाव, चमक बु. निजामपूर, नायगाव, जयसिंग, पथ्रोट आदी सोसायटींच्या जबाबदारी सहायक निबंधक एस.टी. केदार यांनी सोपविली आहे.
या निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रात राहून राजकारण करणारे नेते कामाला लागले आहे. तालुक्यातील तीन सहकारसम्राट आपल्या गटाच्या ताब्यात सहकार संस्था कशी राहील, यासाठी प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीत उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सोडत आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून अर्ज मागे घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग काही पुढाऱ्यांनी सुरू केले आहेत. वडनेर, भूजंग, जगदंब प्राथमिक, शिक्षक पतपेढी, कांडली व सलेपूर येथे १३ संचालक असून या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)