शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
5
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
17
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
18
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
19
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! विहिरीचे पाणी गरम

By admin | Updated: September 24, 2015 00:16 IST

शहरातील बडासे ले-आऊट मधील दिनेश मनोहर टिपरे यांच्या घरातील विहिरीतील पाण्याचे तापमान अचानक वाढले आहे.

मोर्शीतील आश्चर्य : झाकण काढताच निघते वाफ; १० दिवसांपासून तापमान वाढलेलेनरेंद्र निकम मोर्शीशहरातील बडासे ले-आऊट मधील दिनेश मनोहर टिपरे यांच्या घरातील विहिरीतील पाण्याचे तापमान अचानक वाढले आहे. हा आश्चर्यकारक प्रकार मागील १० दिवसांपासून सतत सुरू आहे. सकाळी विहिरीवरील झाकण काढताच गरम पाण्यामुळे निर्माण होणारी वाफ बाहेर येते. टिपरे यांच्या घराशेजारील इतर विहिरींमधील पाणी मात्र थंड आहे. या गरम पाण्याबाबत नाना तर्क व्यक्त केले जात असून टिपरे कुटुंबीय चिंतेत पडले आहे. टिपरे कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना हा प्रकार सुरू झाला. ते स्वगृही परतल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली. प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याला माहिती दिली. आरोग्य विभागाने नमुने तपासणीसाठी नेले आहेत. असा झाला उलगडा१० सप्टेंबर रोजी माठात पाणी भरले असता ते गरम असल्याचे लक्षात आले. पुन्हा पुन्हा पाणी काढले तरीही ते गरमच होते. आंघोळीसाठी वापर विहिरीचे पाणी हाताने काढता यावे, इतकी त्याची पातळी वाढलेली आहे. पाण्याला वास येत नाही. हे पाणी आंघोळीसाठी वापरले जात आहे. श्रीक्षेत्र सालबर्डी येथेही पहिल्या पायरीजवळ असलेल्या बोअरमधून असेच गरम पाणी नेहमी वाहत असते. पाण्याचे नमुने आरोग्य खात्याकडे पाठविलेविहिरीचे पाणी गरम येत असल्याने बघ्यांनी गर्दी केली होती. नमुने तपासणीसाठी आरोग्य खात्याकडे पाठविण्यात आले आहे. आरोग्य खात्याने हे नमुने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडे तपासणीसाठी पाठविले आहे. अद्याप तपासणी अहवाल प्राप्त व्हायची आहे. आठ दिवस बाहेरगावी गेलो होतो. गावाहून परत आल्यानंतर विहिरीतील पाणी काढले. ते गरम आढळून आले. हा प्रकार १० सप्टेंबर रोजी झाला. तेव्हापासून विहिरीचे पाणी पिणे बंद केले. आता या गरम पाण्याचे नमुने तपासणीसाठी आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.- दिनेश टिपरे, विहीरमालक