१७ वर्षीय मुलीला फसवून मागितला 'तो' व्हिडिओ; सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोहचला डायरेक्ट मामाच्या फोनवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:09 IST2026-01-12T17:08:12+5:302026-01-12T17:09:03+5:30

Amravati : एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तथा तिला भीती दाखवून तिचा विवस्त्र व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याची घटना नांदगाव पेठ येथे उघडकीस आली आहे.

A 17-year-old girl was tricked into asking for 'that' video; After it went viral on social media, it reached her uncle's phone directly | १७ वर्षीय मुलीला फसवून मागितला 'तो' व्हिडिओ; सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोहचला डायरेक्ट मामाच्या फोनवर

A 17-year-old girl was tricked into asking for 'that' video; After it went viral on social media, it reached her uncle's phone directly

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तथा तिला भीती दाखवून तिचा विवस्त्र व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याची घटना नांदगाव पेठ येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध १० जानेवारी रोजी पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनुसार, नांदगाव पेठ परिसरातील १७ वर्षीय पीडित तरुणी आणि आरोपी ओम शेंदरकर (वय १९, रा. राम मंदिराजवळ, नांदगाव पेठ) हे एकमेकांना गेल्या काही काळापासून ओळखत होते. गेल्या एका महिन्यापासून त्यांच्यात व्हॉट्सअॅपवर बोलणे सुरू होते. यादरम्यान आरोपीने पीडितेला आपल्याला ती आवडत असल्याचे सांगून तिला प्रपोज केले. त्यानंतर आरोपीने पीडितेची बदनामी करण्याची भीती दाखवली आणि तिला तिचा विवस्त्र व्हिडीओ पाठवण्यास प्रवृत्त केले. १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पीडितेने तो व्हिडीओ आरोपीला पाठवला. मात्र, आरोपीने तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला, ज्यामुळे पीडितेची मोठी बदनामी झाली.

असा झाला खुलासा

हा व्हिडीओ पीडितेच्या मामाच्या व्हॉट्सअॅपवर आला. त्यांनी तातडीने पीडितेच्या घरी जाऊन तिच्या आईला याबाबत माहिती दिली. घरच्यांनी विचारणा केली असता, पीडितेने आपबिती कथन केली. भीतीपोटी तिने हा व्हिडीओ पाठवल्याचे सांगितले. पीडितेच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी ओम शेंदरेकर याच्याविरुद्ध विनयभंग, पॉक्सो, धमकी व आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शहाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 

Web Title : नाबालिग लड़की को धोखा देकर नग्न वीडियो वायरल; मामा तक पहुंचा।

Web Summary : नांदगाँव पेठ में एक 17 वर्षीय लड़की को 19 वर्षीय लड़के ने नग्न वीडियो भेजने के लिए बहकाया, फिर उसे सोशल मीडिया पर साझा कर दिया। वीडियो लड़की के मामा तक पहुंचा, जिसके बाद पुलिस जांच शुरू हुई। आरोपी पर POCSO और IT एक्ट के तहत आरोप लगे हैं।

Web Title : Teen tricked into sending nude video; goes viral, reaches uncle.

Web Summary : A 17-year-old girl in Nandgaon Peth was lured into sending a nude video by a 19-year-old, who then shared it on social media. The video reached the girl's uncle, prompting a police investigation. The accused faces charges under POCSO and IT Act.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.