शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळातही सव्वा महिन्यात राज्यात ९२ एसीबी ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

अमरावती/ संदीप मानकर लॉकडाऊनमध्ये एसीबी ट्रॅपमध्ये घट झाली होती. पण, अनलॉकमध्ये पुन्हा शासकीय कार्यालयाचे कामकाज पूर्ववत झाल्यामुळे कोरोनाकाळातही अधिकारी, ...

अमरावती/ संदीप मानकर

लॉकडाऊनमध्ये एसीबी ट्रॅपमध्ये घट झाली होती. पण, अनलॉकमध्ये पुन्हा शासकीय कार्यालयाचे कामकाज पूर्ववत झाल्यामुळे कोरोनाकाळातही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. राज्यात ४२ दिवसांत ९२ एसीबी सापळे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे दरदिवशी दोन किंवा तीन सापळे यशस्वी होत आहेत.

९२ ट्रॅपमध्ये १२६ आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला आहे. मात्र, ९२ ट्रॅपमध्ये एकही अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराचा एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही, हे विशेष!

बॉक्स:

या विभागात झाले ट्रॅप

सव्वा महिन्यात सर्वाधिक ट्रॅप हे राज्यात पुणे विभागात झाले. या विभागात २३ ट्रॅपमध्ये २९ आरोपींना अटक करण्यात आली.

मुंबईत २, ठाण्यात ७, पुण्यात २३, नाशिक येथे १७, नागपूर येथे १२, अमरावती येथे १०, औरंगाबाद येथे १५, नांदेड येथे ६ ट्रॅप यशस्वी झाले.

बॉक्स:

पाच वर्षांत साडेचार हजार ट्रॅप

प्रकरणे वर्ष २०१६ २०१७ २०१८ २०१९ २०२०

सापळा ९८५ ८७५ ८९१ ८६६ ६३०

अपसंदपदा १७ २२ २२ २० १२

अन्य भ्रष्टाचार १४ २८ २३ ५ २१

एकूण गुन्हे १०२६ ९२५ ९३६ ८९१ ६६३

बॉक्स:

लाच घेण्यात पोलीस विभाग अव्वल

राज्यात सव्वा महिन्यात ९२ ट्रॅप झाले यात लाच खाण्यात पोलीस विभागाच अव्वल असून, यामध्ये १९ ट्रॅप यशस्वी झाले. दुसरा क्रमांक हा महसूल विभागाचा असून, १६ ट्रॅप यशस्वी झाले. महावितरणमध्ये १४ ट्रॅप, तर महानगरपालिका ६, पंचायत समिती ७ ट्रॅप यशस्वी झाले. ९२ ट्रॅपममध्ये १ कोटी ८४ लाख ६२ हजारांची रक्कम आरोपीकडून लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जप्त केली आहे.