शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

९ गटशिक्षणाधिका-यांची वेतनवाढ रोखण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:50 IST

जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त असलेल्या ९ पंचायत समिती अंतर्गत १८५वर्गखोल्या निर्लेखित करण्यासाठी पुढील कारवाई करण्याचे आदेश झेडपी प्रशासनाने  पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी व अन्य जबाबदार अधिकारी व मुख्याध्यापकांना  दिले होते.

अमरावती, दि. 18 -  जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त असलेल्या ९ पंचायत समिती अंतर्गत १८५वर्गखोल्या निर्लेखित करण्यासाठी पुढील कारवाई करण्याचे आदेश झेडपी प्रशासनाने  पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी व अन्य जबाबदार अधिकारी व मुख्याध्यापकांना  दिले होते.मात्र यावर प्रशासकीय कारवाईत दप्तर दिरंगाई केल्याने ९  पंचायत समितीचे गटशिक्षणाधिका-या  आदीच्या जुलै पुढील वार्षीक वेतनवाढी रोखण्याचे निर्देश दिले आहेत.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाºया जिल्हाभरातील १९० वर्गखोल्या शिकस्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी नवीन खोल्याचे बांधकाम करण्यास ६ जून २०१६ रोजी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली आहे. त्यामुळे पुढील कारवाई करण्याच्या सूचना झेडपी प्रशासनाने १४ पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यामार्फत दिल्या होत्या १९० वर्गखोल्यापैकी ९ पंचायत समितीकडून ६५ प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आले. त्यानुसार वरील प्रस्तावानुसार पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी वर्गखोली निर्लेखनाबाबतचे आवश्यक कारवाई करण्याचे कामात दप्तरदिरंगाई केल्याने चिखलदरा,धारणी,नांदगाव खंडेश्र्वर,मोर्शी,धामनगांव रेल्वे,दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी आदी ठिकाणच्या गटशिक्षणाधिका-यांच्या वेतन वाढी रोखण्याचे आदेश ४ आॅगस्ट रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी दिले आहेत.या निर्णया मुळे अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

वर्गखोल्याच्या निर्लेखनाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी वारंवार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी यांना कळविले. मात्र त्यानंतरही प्रस्ताव सादर करण्यात आले नाही. त्यामुळे याला दोषी असलेल्या अधिका-यांची जुलै महिन्यातील वेतन वाढ रोखली आहे.- प्रकाश तट्टे,   अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी