शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

८० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त

By admin | Updated: September 20, 2015 00:40 IST

पुंडलिकबाबा नगरात झुडुपाआड साठा : महसूल विभागाची कारवाई

अमरावती : शहरात अवैध वाळू साठ्यांवर कारवाईचा सपाटा सुरुच आहे. याच श्रृंखलेत शनिवारी स्थानिक टॉवर लाईन परिसरातील पुंडलिकबाबा नगरात ८० ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्याची कारवाई महसूल विभागाने पोलीस संरक्षणात केली. या वाळूची अंदाजे किंमत चार लाख रुपये असल्याची माहिती आहे.नदी, नाल्यातून नियमबाह्य उपसा करुन सदर वाळू ही शहरात साठवून ठेवली जाते. साठवलेली वाळू ही चढ्या दरात विकण्याचा सपाटा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र वाळू तस्करांची मुस्कटदाबी करण्यासाठी तहसीलदार सुरेश बगळे यांनी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने शहरात अवैधरीत्या साठवून ठेवलेल्या वाळू साठ्यांवर धाडसत्र राबवून ते जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. जप्त वाळू साठ्यांचे लिलाव करुन ती रक्कम तिजोरीत जमा केली जात आहे. आतापर्यत ४७ अवैध वाळू साठे जप्त करण्यात आले असून ३० वाळू साठ्यांची लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. लिलावातून आलेली रक्कम महसूल ुिवभागात जमा करुन उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरु आहेत. येथील पुंडलिकबाबा नगरात जप्त करण्यात आलेली वाळू ही ८० ब्रास असल्याचे तहसीलदार बगळे यांचे म्हणने आहे. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढे या वाळूचा नियमानुसार लिलाव केला जाणार आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनुसार ही कारवाई केली जात आहे. जप्त करण्यात आलेल्या वाळू साठ्याच्या परसिरात एम. एच. ३१, एम. ५८४९ क्रमांकाचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. या ट्रकद्वारेच वाळू वाहतूक होत असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज महसूल विभागाचा आहे. रसूल खान हयात खान नामक व्यक्तीचा हा अवैध वाळू साठा असल्याचे जप्ती पंचनामा करताना महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. ही वाळू सर्वे. क्र. ४९ मध्ये साठवून ठेवण्यात आली होती. जप्त वाळू साठ्याचा लिलाव लवकरच केला जाईल, असे तहसीलदार बगळे यांनी सांगितले. या कारवाई दरम्यान पीएसआय बालाजी पुंड, पोलीस कर्मचारी राहुल ग्वालवंशी, मंडळ अधिकारी एस. के. कल्याणकर आदी तलाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)