शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे ६८ कोटी शासनाकडे पडून

By admin | Updated: May 13, 2015 00:35 IST

अमरावती विभागातील दोन लाख शेतकऱ्यांवर दुष्काळी मदत निधीची रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही.

सुमित हरकुट चांदूरबाजारअमरावती विभागातील दोन लाख शेतकऱ्यांवर दुष्काळी मदत निधीची रक्कम अद्यापही प्राप्त झालेली नाही. प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईत मार्च एंडींगच्या नादात प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. हा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी वाटप करणे आवश्यक होते. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी या निधीचे वाटप देय मुदतीत न झाल्यामुळे दुष्काळग्रस्त मदतीचे ६८ कोटी रूपये शासनाकडे परत गेलेत. अद्यापही ही रक्कम शासनाकडे पडून आहे. या परत गेलेल्या निधीपैकी अंदाजे ४८ कोटी रूपयांची मागणी विभागीय प्रशासनाने सरकारकडे केली असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येते.दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतनिधीपैकी विभागातील १ लाख ८९ हजार ४३० शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहेत. विभागातील संपूर्ण प्रशासन मार्च एंडींगच्या प्रक्रियेत गुंतल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचू शकत नाही. मार्च महिन्याचा ताळेबंदची प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांना तातडीने युद्धस्तरावरुन या निधीचे वाटप करण्यात येईल, असे मार्चमध्येच संबंधित प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु चालू वर्षी खरीप हंगाम तोंडावर आला असतानासुद्धा विभागातील दोन लाख शेतकरी दुष्काळग्रस्त मदतनिधीपासून वंचित आहेत. याचा सर्वाधिक फटका बुलडाणा जिल्ह्याला बसला.राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे व दुष्काळाने पिळलेल्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे सर्व राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी, सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी राजकारण करताना दिसतात. परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांचा जीव जातो याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ मिळत नाही. यावरून ही मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किती जागृत आहे, हे दिसून येते. येत्या खरीप पेरणीकरिता शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करणे कठीण जात आहे.