शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन रेशीमबंधनात अडकली ६७७ जोडपी

By admin | Updated: May 23, 2017 00:08 IST

धार्मिक रुढी, परंपरा यात गुरफटून न राहता आधुनिक पद्धतीने विवाह करण्याकडे अनेकांचा कल आहे.

३७७ जोडप्यांना नोटिशी : आॅनलाईन विवाह नोंदणीला तरुणाईची पसंतीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धार्मिक रुढी, परंपरा यात गुरफटून न राहता आधुनिक पद्धतीने विवाह करण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यानुसार १ मे २०१६ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत आॅनलाईन नोंदणी रेशीमबंधनात ६७७ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. राज्य शासनाच्या दुय्यम उपनिबंधक कार्यालयात होणाऱ्या आॅनलाईन विवाह नोंदणीस अनेकांनी प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. आॅनलाईन नोंदणी करताना नियोजित वधू-वरांना वयाचा दाखला, रहिवासी पुरावे एवढी अट पूर्ण करावी लागते. आॅनलाईन नोंदणीनंतर ३० दिवसांनी व ६० दिवसांच्या आत विवाह प्रक्रिया आटोपणे अनिवार्य आहे. जोडप्यांना एकूण ९० दिवसांचा कालावधी मिळत असल्याने ते सोयीचे ठरत आहे. आॅनलाईन विवाह नोंदणी ही प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. या विवाहाला कायदेशीर मान्यता असल्याने भविष्यात येणाऱ्या अडचणी, भानगडीवर मात करण्यासाठी तरुणाईचा कल आॅनलाईन नोंदणी रेशीमगाठीकडे वाढत आहे. मागील वर्षभराच्या आकडेवारीवर नजर टाकली की दरमहिन्याला ६० जोडपे आॅनलाईन नोंदणीच्या रेशीमबंधनात अडकले आहेत.वर्षभरातील आॅनलाईन विवाहाची आकडेवारी१ मे २०१६ पासून आॅनलाईन विवाह नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १ मे २०१६ ते ३० एप्रिल २०१७ ला कालावधीत ६७७ जोडपे विवाहबद्ध झाले आहेत. यात मे २०१६ मध्ये ७२, जून- ६५, जुलै- ६२, आॅगस्ट- ५०, सप्टेंबर- ४२, आॅक्टोबर-३५, नोव्हेंबर- ५४ डिसेंबर- ५३ तर जानेवारी २०१७ मध्ये ६०, फेब्रुवारी- ६०, मार्च- ६२ व एप्रिलमध्ये ८२, अशी जोडपी विवाहबद्ध झाल्याची आकडेवारी आहे.आॅनलाईन विवाह नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही पद्धत अतिशय सुलभ असल्याने अनेकांचा याकडे कल वाढत आहे. या विवाह नोंदणीला कायदेशिर आधार आहे.- अ. म. धुळे, सहायक दुय्यम निबंधक (वर्ग २), अमरावती.