दर्यापूर तालुक्यात ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:00 AM2020-07-08T05:00:00+5:302020-07-08T05:01:12+5:30

तालुक्यामध्ये ७५ हजार २९७ हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन आहे. त्यात कपाशी ३६ हजार ८८४ हेक्टर, मूग १३ हजार ९०१ हेक्टर, तूर १० हजार ६२६ हेक्टर, सोयाबीन ९ हजार २८७ हेक्टर, उडीद २ हजार ७५ हेक्टर, ज्वारी ७५.८० हेक्टर अशा एकूण ७५ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून, ती टक्केवारी ९६ आहे. पैकी चार दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने थिलोरी, कळमगव्हाण, लखापूर, आराळा, बोराळा, कळाशी या क्षेत्रांतील सुमारे ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली बुडाली.

650 hectares of agricultural land under water in Daryapur taluka | दर्यापूर तालुक्यात ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

दर्यापूर तालुक्यात ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

Next
ठळक मुद्देप्राथमिक अहवाल; सर्वेक्षणाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सुमारे ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. त्या सर्व क्षेत्रांतील शेतजमीन पिकांसह खरडून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्याअनुषंगाने तहसील कार्यालय, महसूल विभाग, पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे.
तालुक्यामध्ये ७५ हजार २९७ हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन आहे. त्यात कपाशी ३६ हजार ८८४ हेक्टर, मूग १३ हजार ९०१ हेक्टर, तूर १० हजार ६२६ हेक्टर, सोयाबीन ९ हजार २८७ हेक्टर, उडीद २ हजार ७५ हेक्टर, ज्वारी ७५.८० हेक्टर अशा एकूण ७५ हजार ४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून, ती टक्केवारी ९६ आहे. पैकी चार दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने थिलोरी, कळमगव्हाण, लखापूर, आराळा, बोराळा, कळाशी या क्षेत्रांतील सुमारे ६५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली बुडाली. त्यामुळे पिके सडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.

पावसामुळे तालुक्यात सुमारे ६५० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी कृषिसहायक, तलाठी, ग्रामसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
- राजकुमार अडगोकर
तालुका कृषी अधिकारी, दर्यापूर

तालुक्यातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. त्याबाबत सर्र्वेेक्षणाच्या सूचना दिल्या आहेत. अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल.
- योगेश देशमुख, तहसीलदार

Web Title: 650 hectares of agricultural land under water in Daryapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.