शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

६२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

By admin | Updated: October 1, 2015 00:17 IST

केंद्र व राज्य शासनाने महापालिकेला पाठविलेल्या १३ व १४ व्या वित्त आयोगातील ६२ कोटी रूपयांच्या विविध विकासकामांना बुधवारी मान्यता देण्यात आली.

अर्ध्या तासात गुंडाळली विशेष सभा : १३-१४ व्या वित्त आयोगातील निधी अमरावती : केंद्र व राज्य शासनाने महापालिकेला पाठविलेल्या १३ व १४ व्या वित्त आयोगातील ६२ कोटी रूपयांच्या विविध विकासकामांना बुधवारी मान्यता देण्यात आली. नगरसेवक व आमदारांंनी सुचविलेल्या विकासकामांना प्रभागनिहाय प्राधान्य देण्यात आले.महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेच्या पीठासीनावर महापौर चरणजितकौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाज सांभाळले. शासन अनुदानातून करावयाच्या विविध विकासकामांना त्वरेने मंजुरी देण्याच्या निर्णयाने सभेची सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी सुरूवात झाली. ही सभा ११ वाजून ४० मिनिटांनी म्हणजेच अर्ध्या तासात गुंडाळण्यात आली. प्रारंभी शोकप्रस्ताव, अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, हे विशेष. यावेळी काँग्रेसच्या कांचन ग्रेसपुंजे यांंंनी विकासकामांची यादी मंजूर करताना बडनेरा येथील सुपर एक्सप्रेस हायवे जोडरस्ता, उद्यानाची निर्मिती करण्याच्या सूचना दिल्यात. स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी १३ व १४ व्या वित्त आयोगातून मंजूर करावयच्या विकास कामांवर अधिक चर्चा न करता महापौरांना ही कामे मंजूर करण्याचे अधिकार प्रदान करण्याचा मुद्दा रेटला. विकासकामांचे भूमिपूजन करताना महापौर चरणजित कौर नंदा, पक्षनेता बबलू शेखावत आणि विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांना आवर्जून निमंत्रण मिळाले पाहिजे, ही दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी ठामपणे सांगितले. स्वीकृत सदस्य अजय सामदेकर यांनी महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य असताना केवळ दोनच स्वीकृत सदस्यांचा विकासकामांच्या यादीत समावेश केल्याची बाब आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. रिपाइंचे गटनेते प्रकाश बनसोड यांनी प्रभाग क्र.४३ अंतर्गत बडनेरा येथील अकोला महामार्गालगतच्या स्मशानभूमीचा विकासाचा प्रश्न लावून धरला.पाच वर्षांत २१० कोटींची होणार विकासकामेबुधवारी पार पडलेल्या विशेष सभेत १३ व १४ व्या वित्त आयोगातील अनुदानातून करावयाचा विविध विकासकामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. ही मंजुरी प्रदान करताना सभागृहाने पाच वर्षांत २१० कोटी रुपये खर्चून होणाऱ्या विकासकामांच्या दर कराराला मान्यता दिली आहे.६६ कोटींचे अनुदान मिळालेमहापालिकेला १३ व १४ व्या वित्त आयोगाचे ६६ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले असून हे अनुदान वेळीच खर्च केल्यास शासन प्रोत्साहनपर २५ टक्के अनुदान देणार आहे. परिणामी ही रक्कम ८५ कोटी रुपयांच्या वर पोहचेल असा अंदाज प्रशासनाचा आहे. एकूण ६२ कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता प्रदान करण्यात आली.तिजोरीत पैसे नसल्याची ओरडमहापालिकेत १३ व १४ व्या वित्त आयोगाचे अनुदान प्राप्त झाले असले तरी ते प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च केले, ही बाब विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, दिगंबर डहाके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. १३ व्या वित्त आयोगाच्या अनुदानाला बूड लागले आहे.