शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५४ तलाव कोरडे

By admin | Updated: March 29, 2017 00:27 IST

यंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ५४ सिंचन तलाव कोरडे पडले आहेत़

दुष्काळाची झळ : गुरे, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती, मार्चअखेरची स्थिती धामणगाव रेल्वे : यंदा सरासरीपेक्षा अल्प झालेल्या पावसामुळे उन्हाचा पारा वाढण्यापूर्वीच जिल्ह्यातील ५४ सिंचन तलाव कोरडे पडले आहेत़ या तलावात पाणीच नसल्यामुळे गावातील शेतात चरायला गेलेले गुरे व वण्यप्राणी यांची पाण्यासाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे़ ही स्थिती मार्च महिन्याच्या अखेर असल्यामुळे आगामी मे महिन्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता आहे़जिल्ह्यात जिल्हापरिषद अंतर्गत ६५ सिंचन तलाव आहेत़ या तलावाची खोली सरासरी अडीच मीटर ते चार मीटरपर्यंत आहे़ यंदा या पावसाळ्यात २२ तलाव केवळ १०० टक्के भरले होते, तर ११ तलाव ६० टक्क्यावर तसेच २० तलावात ५०टक्के, ८ तलावांत २५ टक्के व ४ तलावांत १० टक्के जलसाठा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. आता या तलावातील जलसाठा पूर्णत: संपला असून सध्या यातील अनेक तलाव कोरडे पडले आहेत़ गावातील जनावरे सकाळी चरायला गेल्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा मोठा आधार मिळत असत विशेषत:जंगलातील वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. आता तलावात पाणीच नसल्यामुळे या वन्यप्राण्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे़धारणी तालुक्यात असलेल्या १९तलावापैकी केवळ चार तलावात २० टक्के पाणीसाठा आहेत़ दुसऱ्या क्रमांकाचे तिवसा तालुक्यात असलेल्या ११ तलावांपैकी ३ तलावांत एक मीटर जलसाठा आहे़ अमरावती,अचलपूर, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील प्रत्येकी पाच तलावांतील पाणीसाठा संपला तर चांदूर बाजार मोर्शी या तालुक्यातील प्रत्येकी तीन लघुसिंचन तलावात केवळ दिड टक्के जलसाठा वरूड तालुक्यातील सहा लघुसिंचन तलावाची हीच स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिलीत़ (तालुका प्रतिनिधी)तापमानवाढ कारणीभूत तलावांमध्ये पाणीसंचय पातळी कमी असते. त्यातच गेल्या दोन आठवड्यांपासून दिवसाच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे तलावांची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. बहुतांश तलावांत केवळ मृतसाठाच शिल्लक आहे.