शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 3825 विद्यार्थी डुप्लिकेट शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आली. त्यानंतर  विविध जिल्ह्यांमध्ये काही विद्यार्थ्यांची नावे दोन शाळा वा वर्गामध्ये नोंदविल्याचे आढळून आले. अशा विद्यार्थ्यांची नावे शाळेच्या यादीतून वगळण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. २२ सप्टेंबर रोजी या अनुषंगाने शिक्षण संचालकांनी  शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठविले.

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सरल प्रणालीअंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये आधार क्रमांकानुसार नोंदणी झाल्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत जिल्ह्यात ३  हजार ८२५ विद्यार्थी डुप्लिकेट आढळले असून, या विद्यार्थ्यांची दोन शाळांमध्ये नोंद दिसत आहे. या विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आली. त्यानंतर  विविध जिल्ह्यांमध्ये काही विद्यार्थ्यांची नावे दोन शाळा वा वर्गामध्ये नोंदविल्याचे आढळून आले. अशा विद्यार्थ्यांची नावे शाळेच्या यादीतून वगळण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. २२ सप्टेंबर रोजी या अनुषंगाने शिक्षण संचालकांनी  शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठविले.

अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता

- जिल्ह्यात ३ हजार ८२५ विद्यार्थी डुप्लिकेट आढळले आहेत. शासननिर्णयाप्रमाणे ३० विद्यार्थ्यांमागे एका शिक्षकाच्या नियुक्तीचे धोरण आहे. बोगस विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील काही शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. - दोन वर्षांपासून कोरोनामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संचमान्यता झालेली नाही. ही संचमान्यता झाल्यानंतर दुबार विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. 

सर्वाधिक डूप्लीकेट विद्यार्थी शहरात- महापालिका क्षेत्रातील विविध शाळांमध्ये सरल प्रणाली अंतर्गत स्टुडंट पोर्टलमध्ये नोंद करण्यात आलेल्या माहितीमध्ये काही विद्यार्थ्यांच्या दुबार नोंद झाल्या असल्याचे  शिक्षण संचालनालयाचे निदर्शनास आले आहे. - त्यानुसार अमरावती महापालिका क्षेत्रात १२८१ विद्यार्थी डुप्लिकेट असल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. त्यामुळे दुबारा नोंद असलेल्या अशा विद्यार्थ्यांची  शिक्षण विभागाकडून पडताळणी केली जाणार आहे.- जि.प. शिक्षण विभागामार्फत डुप्लिकेट नोंद असलेल्यांची तपासणी केली जाईल.

जिल्ह्यात दुबार नाव असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ८२५ असल्याचे समोर आले आहे. हे सर्व विद्यार्थी डुप्लिकेट असल्याचे स्पष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यात यावी तसेच विद्यार्थी नेमके कोणत्या शाळेत आणि वर्गांमध्ये शिकत आहेत, त्या शाळा, वर्गांना क्षेत्रीय यंत्रणेमार्फत भेट देऊन पडताळणी करावी, ज्या अतिरिक्त वर्गामध्ये विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. ती दुबार नोंद जनरल रजिस्टर व स्टुडंट पोर्टलमधून रद्द करावी, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. १ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाहीचा अहवाल सादर करावा लागणार आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी