शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर ३ लाख ‘सेल्फी विथ ट्री’

By admin | Updated: July 4, 2016 00:09 IST

पर्यावरण राज्यमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी १ जुलै रोजी २ कोटी वृक्ष लागवड अभियानात कर्मचारी, ...

भरघोस प्रतिसाद : वृक्ष लागवडीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव अमरावती : पर्यावरण राज्यमंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी १ जुलै रोजी २ कोटी वृक्ष लागवड अभियानात कर्मचारी, अधिकाऱ्यांना व जनतेला सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. वृक्षरोपण करून लावलेल्या झाडांसोबत स्वत:चा फोटो काढून पाठविण्याचे आवाहनही शासनामार्फत करण्यात आले होते. या उपक्रमाला कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी व जनतेनी भरघोस पाठिंबा दर्शविला आहे. तब्बल ३ लाख २३ हजार सेल्फि विथ ट्रीचे फोटो पर्यावरण राज्यमंत्र्यांना त्यांच्या ८३७८०८९००० या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर मिळाले आहे.ना. पोट यांच्याकडे पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, खनिकर्म व उद्योग अशी महत्त्वाची खाती असून त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक विकास मडंळासारखा महत्त्वाचा विभाग आहे. वन खात्याबरोबरच पर्यावरण टिकविण्याची जबाबदारी पर्यावरण खात्यावर आहे. पर्यावरण राज्यमंत्री म्हणून २ कोटी वृक्ष लागवडीत ना. प्रवीण पोटे यांनी प्रथमपासूनच अतिशय हिरीरीने सहभाग घेऊन त्यांच्या अधिनस्त असलेल्या खात्यातील व महामंडळातील प्रत्येक कर्मचाऱ्याने, अधिकाऱ्याने व जनतेंनी व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या गैरशासकीय संस्थांनी लावलेल्या वृक्षासोबत फोटो (सेल्फी विथ ट्री) पाठविण्याचे आवाहन त्यांनी मुबंई येथे पार पडलेल्या पर्यावरण परिषदेत पत्रकाद्वारे केले होते. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित झालेल्या आढावा बैठकीत ८३७८०८९००० हा क्रमांक देऊन नागरिकांनी व कर्मचाऱ्यांना सेल्फी विथ ट्री पाठविण्याचे आवाहन केले होते. त्याचा परिणाम संबध महाराष्ट्रातून ३ लाख २३ हजार जणांनी सेल्फी विथ ट्री पाठविले आहेत. अजूनही सेल्फी विथ ट्री मिळत आहेत. उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार ना.पोटे करणार आहेत.