चंद्रभागेची ३, सपनची २ दारे उघडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:00:52+5:30

अचलपूर, परतवड्यासह मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शुक्रवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शुक्रवारी रात्री ११ वाजतानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तेथे शनिवारी पहाटे ६ वाजता ६५ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. पावसाचे ते पाणी अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा व शहानुर प्रकल्पात येत असल्याने प्रकल्पाच्या पाण्यात वाढ झाली आहे.

3 doors of Chandrabhaga and 2 doors of Sapna opened | चंद्रभागेची ३, सपनची २ दारे उघडली

चंद्रभागेची ३, सपनची २ दारे उघडली

ठळक मुद्दे१५० हेक्टर शेत जमीन पाण्यात : 'बगाजी'ची ३१ दारे उघडली

परतवाडा : शुक्रवारपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे अचलपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रभागा प्रकल्प ९३ टक्के भरल्यामुळे प्रकल्पाची तीन तर सपन प्रकल्प ८२ टक्के भरल्याने दोन दारे पाच मीटरने उघडण्यात आली आहेत. अतिवृष्टी झाल्यास नुकसान होऊ नये व तत्काळ मदत पोहोचावी यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
अचलपूर, परतवड्यासह मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शुक्रवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शुक्रवारी रात्री ११ वाजतानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तेथे शनिवारी पहाटे ६ वाजता ६५ मिलिमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. पावसाचे ते पाणी अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा व शहानुर प्रकल्पात येत असल्याने प्रकल्पाच्या पाण्यात वाढ झाली आहे. सर्व प्रकल्प भरत आले असल्याची माहिती प्रकल्प अभियंता सुबोध इंदुरकर तर चंद्रभागा प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता विठ्ठल पाटील यांनी दिली.
नदीकाठच्या
गावांना सतर्कतेचा इशारा
परतवाडा शहरातून वाहणाऱ्या चंद्रभागा, सपन, बिच्छन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या तरी कोणत्याही गावात पाणी शिरले नसल्याची माहिती अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव यांनी ‘लोकमत'शी दिली. धोतरखेडा, सावळी दातुरा, भिलोना, चमक (खु), वडगाव फत्तेपुर असदपूर , सुरवाडा आदी ग्रामीण भागातील गावांनासुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Web Title: 3 doors of Chandrabhaga and 2 doors of Sapna opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.