शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

खर्च सादर करण्यासाठी २८ ची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्यांना अंतिम खर्च सादर करण्याची २८ फेब्रुवारी ही डेडलाईन मिळाली आहे. ...

अमरावती : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्यांना अंतिम खर्च सादर करण्याची २८ फेब्रुवारी ही डेडलाईन मिळाली आहे. ही वेळ न पाळल्यास विजयी अथवा पराभूत उमेदवारांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास वंचित केले जाऊ शकते. निवडणूक आयोगाच्या या निर्देशांनी अनेकांना, विशेषत: विजयी सदस्यांना धडकी भरली आहे. नवीन सरपंच निवडीच्या काळातच हिशेब सादर करण्यासाठीही संबंधितांना धावपळ करावी लागत आहे.

निवडणूक खर्चाचा हिशेब जुळवण्याची तयारी सर्वांनीच सुरू केली आहे. महिन्या अखेरीस त्याची कागदपत्रे उपजिल्हा कार्यालय पोहोचणार आहेत. जिल्हा प्रशासनाने तशा सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यांच्याव्दारे निवडणूक लढलेल्या प्रत्येकापर्यंत त्या पोहोचल्या आहेत. निवडणूक काळात उमेदवाराला खर्चाची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. ही मर्यादा ग्रामपंचायतीच्या सदस्यसंख्येनुसार होती. जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली. १८ जानेवारीच्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांना त्यांची प्रमाणपत्रे दहा-पंधरा दिवसांच्या अंतराने देण्यात आली. त्यापुढे २९ जानेवारी रोजी संबंधित विजयी सदस्यांच्या नावाचे गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध केले. तेव्हापासून महिनाभराच्या आत खर्चाचा अंतिम हिशेब सादर करायचा असतो. त्यानुसार २८ फेब्रुवारीच्या आत सर्वांनाच प्रचार खर्चाचे अंतिम लेखे जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन करावे लागणार आहेत. ज्यांना प्रत्येक निवडणूक लढवायची असते वा गावपातळीवर निवडणुकीचे नेतृत्व करावे लागते, त्यांना या डेडलाईनची पर्वा करणे आवश्यक झाले आहे. जे सादर करणार नाहीत, त्यांच्यावर दंडासह पुढील निवडणुकांसाठी अपात्र ठरविले जाण्याची कारवाई होऊ शकते.

बॉक्स

ग्रा.प.ची सदस्य संख्या खर्चाची मर्यादा

७ ते ९ २५०००

११ ते १३ ३५०००

१५ ते १७ ५००००

बॉक्स

कोरोनाकाळात मिळाली मुभा

साधारणत: मतमोजणी पार पडली, त्या दिवसापासून महिनाभराच्या निवडणूक खर्चाचे अंतिम लेखी अहवाल सादर करावयाचे असतात. परंतु, या वर्षी गॅझेट नोटिफिकेशन उशिरा निघाल्याने त्या तारखेपासून महिनाभराच्या आत अंतिम खर्च सादर करण्याची मुभा मिळाली.