शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २५० तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त; दहा वर्षांपासून भरतीच नाही

By गणेश वासनिक | Updated: September 13, 2024 11:01 IST

Amravati : कारागृहांमध्ये सुरक्षा, न्यायालयीन, प्रशासकीय कामकाज खोळंबतेय

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : राज्याच्या कारागृहांमध्ये तुरुंगाधिकारी श्रेणी-२ची तब्बल २५० पदे रिक्त आहेत. हे पद कार्यकारी असल्यामुळे कारागृहातील सुरक्षा, न्यायालयीन आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचे वास्तव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तुरुंगाधिकारी या पदाची पदभरती घेतली जाते. मात्र दहा वर्षांपासून भरतीप्रक्रिया राबविण्यात आली नसल्याची माहिती आहे. 

गृह विभागाने २०१४ पासून तुरुंगाधिकारी श्रेणी-२ या पदभरतीला मंजुरी प्रदान केली नाही. त्यामुळे तुरुंगाधिकारी पदभरती परीक्षेच्या प्रतीक्षेत अनेक युवकांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. मात्र गृहविभागाकडून याबाबत सकारात्मक विचार केला जात नाही, असे दिसून येते. राज्यात एकूण ६० कारागृहे आहेत. यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे आणि एक महिला कारागृह आहेत. या सर्व कारागृहांची एकूण बंदीक्षमता २७ हजार ११० असून, कारागृहात प्रत्यक्षात ४१ हजार ७५० कैदी बंदिस्त आहेत. तुरुंगाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याबाबत कारागृह प्रशासनाच्या मुख्यालयाचे प्रमुख डॉ. जालिंदर सुपेकर यांच्याशी 'लोकमत'ने विचारणा केली असता ही पदे रिक्त आहेत; पण नेमकी किती हे सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. 

ना जाहिरात, ना पदभरती एमपीएससीमार्फत तुरुंगाधिकारी पदासाठी परीक्षा घेणे अपेक्षित आहे. मात्र पदभरतीला गृह विभागाकडून मान्यता मिळाली नाही. 'तारीख पे तारीख' सुरू आहे. ना जाहिरात, ना परीक्षा पुढे निवड कधी होणार हे सांगणे कठीण आहे. प्रशिक्षणाचा तर प्रश्न येत नाही. त्यामुळे या पदभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणाईच्या स्वप्नावर विरजन येत असल्याचे चित्र आहे.

एडीजी, तीन डीआयजीचे पदे रिक्त गृह विभागाच्या कारागृह प्रशासनाचा कारभार रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येते. कारागृह प्रशासनात अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) हे पद रिक्त आहेत. तीन विशेष पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) पदाचा प्रभारी कारभार सुरू आहे. सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडे कारागृह प्रशासनाच्या एडीजी पदाची धुरा सोपविली आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती