शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात कुटुंबनियोजनाच्या १ हजार ७७२ यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST

अमरावती/ भातकुली: कोरोनाकाळातही आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी क्षेत्र मिळून १ हजार ७७२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन कुटुंब नियोजन ...

अमरावती/ भातकुली: कोरोनाकाळातही आरोग्य विभागाने ग्रामीण व शहरी क्षेत्र मिळून १ हजार ७७२ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन कुटुंब नियोजन कार्यक्रमाची जिल्ह्यात यशस्वीरीत्या अंमलबजावणी केली आहे.

आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी कोरोना महामारीच्या काळातसुद्धा शहरी व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कुटुंब नियोजन सर्वेक्षण केले. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण व प्राथमिक औषधोपचार केला आहे. राष्ट्रीय कार्यक्रम राबवित असताना लाभार्थींचा विश्वास संपादन करून त्यांना कुटुंब नियोजनाचे फायदे समजावून सांगून त्यासाठी प्रोत्साहित केले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा संवेदनशील विषय आहे. त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व भावनिक असे दूरगामी परिणाम समाज व्यवस्थेवर होत असतात. त्यामुळे आरोग्य विभागाचा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून गणला जातो.

१४ तालुक्यांमध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरे उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये घेण्यात आली. त्यात जिल्ह्यामध्ये एकूण ११७२ शस्त्रक्रिया झाल्या. त्यात पुरुष ५३ व स्त्री शस्त्रक्रिया १७१९ झाल्या आहेत. सगळीकडे कोविड १९ ची कामे सांभाळून न थकता अगदी जोमाने आरोग्य विभाग आपले कर्तव्य व कार्य पूर्ण करीत आहेत. कुटुंब कल्याण विभागातील प्रशासकीय अधिकारी सुभाष सिडाम, आरोग्य सहायक कुंभलवार, आरोग्य सेविका प्रीती तसरे हे काम सांभाळत असून, उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

कोट

लोकसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने खारीचा वाटा उचलून लाभार्थींचे मतपरिवर्तन करणे व शस्त्रक्रियेसाठी तयार करणे हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचाच एक अविभाज्य घटक आहे. त्यांच्या परिश्रमामुळे जिल्ह्यात कुटुंब नियोजन कार्यक्रमाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी झाली.

- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी