अवैध दारूसह १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:12 IST2021-04-17T04:12:40+5:302021-04-17T04:12:40+5:30

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी परसोडा मार्गावर कारवाई करून अवैध दारूसह १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही ...

1.10 lakh worth of illicit liquor seized | अवैध दारूसह १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारूसह १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी परसोडा मार्गावर कारवाई करून अवैध दारूसह १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी केली.

पोलीससूत्रानुसार, परसोडा गावाकडून दोन इसम ऑटोत अवैधरीत्या हातभट्टीची दारू आणत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून २० हजारांच्या गावठी दारूसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ९० हजारांचा ऑटो असा एकूण १ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी सतीश अशोक दुऱ्योधन (३४, रा. महेंद्र कॉलनी), किसन शेषराव हांडे (६३, रा. लक्ष्मीनगर) याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पीआय कैलाश पुंडकर, एएसआय संजय वानखडे, पोलीस जमादार रंगराव जाधव, जावेद अहमद, दीपक सुंदरकर, नीलेश पाटील, एजाज शहा, चालक प्रशांत नेवारे यांनी केली.

Web Title: 1.10 lakh worth of illicit liquor seized