शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

१०५ सुवर्ण, २२ रौप्य; पीएचडीने ४३९ जणांना गौरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:26 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी थाटात पार पडला.

ठळक मुद्देविद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ : ३६,७२२ पदवी, ४८ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी थाटात पार पडला. यावेळी ४३९ संशोधकांना आचार्य (पीएचडी), एका संशोधकास मानवविज्ञान पंडित, गुणवंतांना १०५ सुवर्ण, २२ रौप्य पदके, २४ रोख पारितोषिके तसेच ३६ हजार ७२२ विद्यार्थ्यांना पदवी आणि ४८ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली. संतोष ऊर्फ भुजंगराव ठाकरे यांना कुलगुरूंच्या हस्ते डी.लिट. प्रदान करण्यात आली. यावेळी सर्वाधिक पदके प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये सचिन जोशी, मदीहा महरोश मो. साकिब, प्रियल काजळकर यांचा गौरव करण्यात आला.विद्यार्थ्यांना पदके, पुरस्काराने गौरविलेसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३४ व्या दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींना पदके, पारितोषिके देऊन शुक्रवारी गौरविण्यात आले. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या हस्ते पदके देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.विविध विद्याशाखेचे पदक पुरस्कार्थीदिव्या संतानी (रसायनशास्त्र, दोन सुवर्ण, रौप्य), सबा नाज अब्दुल खालीद सादागर (प्राणिशास्त्र, सुवर्ण), गोकुल बजाज (वनस्पतिशास्त्र, दोन सुवर्ण, रौप्य), विशाखा आसटकर (गणित, सुवर्ण, रौप्य), पायल वसुले (गणित, सुवर्ण), आकाश धर्मिक (जीवतंत्रशास्त्र, रौप्य), धनश्री कोठेकर (पदार्थविज्ञान, सुवर्ण), सारिका सुरवाडे (सूक्ष्मजीवशास्त्र, सुवर्ण), राणी कोल्हे (वनस्पतिशास्त्र, सुवर्ण), पायल झुंदानी (गणित, रौप्य), मदीहा महरोश मो. साकीब (विज्ञान, पाच सुवर्ण, तीन रौप्य), सीमा पुरबूज (विज्ञान, रौप्य), नम्रता रायबोले (रसायनशास्त्र, सुवर्ण)अभियांत्रिकी तांत्रिकी पदक, पुरस्काराचे मानकरीप्रियल काजळकर (स्थापत्य, पाच सुवर्ण), तुबा शबनम मो. मुकर्रम (ईटीसी, दोन सुवर्ण), प्रशांत जामोदकर (इलेक्ट्रॉनिक्स पॉवर, सुवर्ण), वर्षा वर्मा (वास्तुविज्ञान, सुवर्ण), अदिती झुनझुनवाला (आयटी, सुवर्ण), प्रवीण पाटील (टेक्सटाइल इंजिनीअरिंग, सुवर्ण), साजिद शेख हुसेन (केमिकल इंजिनीअरिंग, सुवर्ण), गार्गी मोहरील (यांत्रिकी, तीन सुवर्ण), अपेक्षा उमाटे (संगणकशास्त्र, तीन सुवर्ण), भावेश क्षीरसागर (भेष्यज विज्ञान, दोन सुवर्ण), ईश्वरी सावजी (कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, सुवर्ण).वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखापूजा लालवानी (व्यवसाय प्रशासन, तीन सुवर्ण), सपना पिंजानी ( वाणिज्य पारंगत, सुवर्ण), तेजल पुनसे (वाणिज्य स्नातक, चार सुवर्ण), रूचिता जोशी (वाणिज्य स्नातक, रौप्य), नेहा बुटोलिया (व्यवसाय प्रशासन, सुवर्ण).मानवविज्ञान विद्याशाखा पदक पुरस्कार्थीओमेश्वरी बंड (इंग्रजी, दोन सुवर्ण), स्नेहा ढोले (इंग्रजी, रौप्य), सचिन जोशी (मराठी, सहा सुवर्ण), पूजा गायकवाड (भारतीय संगीत, सुवर्ण), निहारिका घोडेराव (संस्कृत, सुवर्ण), अरशी परवेज दोकडिया (इंग्रजी वाङ्मय, सुवर्ण), पूजा महेशकर (संस्कृत वाङ्मय, दोन सुवर्ण), प्राजक्ता काळबांडे (संगीत, रौप्य), करुणा शिरसाट (वाङ्मय स्नातक, सुवर्ण), नाजीया परवीन नसीबखां (वाङ्मय उर्दू, सुवर्ण), प्रीती सहारे (संस्कृत, सुवर्ण), पूजा डाहाके (मराठी वाङ्मय, सुवर्ण, रौप्य), तेजश्री निचडे (पाली, सुवर्ण).समाजविज्ञान विद्याशाखेतील पदक, पुरस्कार्थीमनीषा कडू (अर्थशास्त्र, दोन सुवर्ण), विशाल वानखडे (राज्यशास्त्र, सुवर्ण), सारिका वनवे (समाजशास्त्र, सुवर्ण), पूजा गुल्हाने (अर्थशास्त्र, रौप्य), मेघा बावने (गृहअर्थशास्त्र, सुवर्ण), शीतल वरठी (भूगोल, सुवर्ण), वैशाली कोरडे (इतिहास, सुवर्ण), भावना शिरसाट (राज्यशास्त्र, सुवर्ण), करुणा शिरसाट (अर्थशास्त्र, सुवर्ण, रौप्य), अमीर इस्त्राईल शेख (विधी पारंगत, दोन सुवर्ण), प्रशिक गवई (विधी, सुवर्ण), नितीश शर्मा (विधी, तीन सुवर्ण, एक रौप्य), निकिता शर्मा (अभ्यास विद्याशाखा, सुवर्ण), नाझिया नझीस मो. सलिम (शिक्षण स्नातक, दोन सुवर्ण), पूजा दायमा (गृहविज्ञान, सुवर्ण), कावेरी येवले (गृहविज्ञान, रौप्य), प्रणिता राठोड (गृहविज्ञान, रौप्य), मुनाझा सिद्दीक मिर्झा (गृहविज्ञान, सुवर्ण), तृप्ती घाटोळ (एमएमसी, दोन सुवर्ण), शबनम कासीम सय्यद (एमएमसी, सुवर्ण), प्रतीक पाटमासे (एमएमसी, रौप्य), शुभम पोलाडे (ग्रंथालय, माहिती, सुवर्ण), आरती सावळे (ग्रंथालय, माहिती, सुवर्ण), ऋतुजा माई (आयु:शल्य विज्ञान, सुवर्ण, रौप्य), पलक चिराणिया (आयु:शल्य विज्ञान, तीन सुवर्ण), खोजा आर्फिन अफताब अली (आयु:शल्य विज्ञान, सुवर्ण), कस्तुरी भिसे (आयु:शल्य विज्ञान, सुवर्ण), भक्ती मेहता (आयु:शल्य विज्ञान, सुवर्ण, रौप्य), सय्यद इमरान अली (आयुर्वेदाचार्य, दोन सुवर्ण).

आचार्य पदवीप्राप्त नवसंशोधकांमध्ये नाराजीमहत्प्रयासाने आचार्य पदवी (पीएच.डी.) प्राप्त करणाºया नवसंशोधकांना कुलगुरू अथवा पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान न करता, ती संबंधित विभागातून दिली जाईल, असा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार दीक्षांत समारंभात आचार्य पदवी मिळविलेल्या नवसंशोधकांना जागेवर उभे करून त्यांना पदवी बहाल केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, मंचावर बोलावून सन्मानाने आचार्य पदवी बहाल न केल्याबद्दल नवसंशोधकांमध्ये प्रचंड नाराजी उमटली आहे.