शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसांत १०२ चोऱ्या

By admin | Updated: December 22, 2015 00:20 IST

चोरी, घरफोडी, चेनस्रॅचिंग, खंडणी, वाटमारी, फसवणूक असे गुन्ह्याच्या नानाविध प्रकाराचे शहरात सुरू असलेले सत्र पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपल्याचेच द्योतक आहे.

खाकीचा धाक गेला कुठे ? : ३३ लाखांच्या ऐवजावर डल्लाअमरावती : चोरी, घरफोडी, चेनस्रॅचिंग, खंडणी, वाटमारी, फसवणूक असे गुन्ह्याच्या नानाविध प्रकाराचे शहरात सुरू असलेले सत्र पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपल्याचेच द्योतक आहे. चेनस्रॅचिंग आणि चोरीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षेसाठी नागरिकांनी कुणाकडे धाव घ्यावी, कोणाचा आधार शोधावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २० दिवसांत शहर आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारच्या २७६ घटनाांची नोंद झाली आहे. यात १०२ प्रकरणांत चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आलेत. १०० पेक्षा अधिक चोरीच्या घटनांसह एटीएम पासवर्ड, फसवणूक या माध्यमातून अमरावतीकरांच्या खिशावर चोरट्यांनी तब्बल ३१ लाख रूपयांचा डल्ला मारला. गेल्या २० दिवसांतील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता सुरक्षितता धोक्यात आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.दुचाकी, मोबाईल एवढेच काय तर अमरावतीच्या घरातील दाळ, तांदुळही सुरक्षित नाहीत. दुचाकी आणि मोबाईल चोरीसोबत घरफोडीच्या घटनांमधून लाखोंचा ऐवज चोरीला जात असताना झालेल्या चोऱ्यांचा उलगडा झाल्याचे प्रमाण नगण्य आहे. या महिन्यात दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: कहर माजवला. एकाच दिवशी ३-३ दुचाकी लंपास करण्यात आल्याने दुचाकी पार्क करायची कुठे, असा प्रश्न दुचाकी चालकांना पडला आहे. यशोदानगर परिसरात एक दुचाकी पेटविण्यात आली. एकाकडून खंडणी वसूल करण्यात आली. एटीएम पासवर्ड विचारून खात्यातील रक्कम वळती करून ६ व्यक्तींची फसवणूक केली. शहरात ठिकठिकाणी रात्री पोलिसांची गस्तच नसल्याने व्यावसायिक प्रतिष्ठाने फोडून लाखोंच्या ऐवज लंपास करण्यात आला. या चोरीच्या सत्रामुळे व्यावसायिकांकडून ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्याला देण्यात आलेली बगलसुद्धा चव्हाट्यावर आली आहे. चेन स्रॅचिंगच्या तीन घटनांमधून लाखभर किमतीचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार आरोपींनी पळ काढला. अपघात, मारामाऱ्या वेगळ्याच. याशिवाय फसवणुकीचे ४ प्रकार उघड झाले. यात प्रामुख्याने लाईफलाईन ओरीएंटल ट्रेडलिंक्स या खासगी वित्तीय संस्थेकडून झालेल्या फसवणुकीचा समावेश आहे. तडीपारांकडून हत्या झाल्याने तडीपार आरोपींचा शहरातील मुक्त वावर, हा नवीन प्रश्न अमरावती पोलिसांसमोर उभा ठाकला आहे. शहरात फिरणाऱ्या तडीपारांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. (प्रतिनिधी)