२५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान विदर्भातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी ! उत्तर-पूर्व मान्सून डिसेंबरपर्यंत राहणार सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:34 IST2025-10-24T17:32:48+5:302025-10-24T17:34:08+5:30
Akola : हा पाऊस अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे होतो. हा मान्सून प्रामुख्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात सक्रिय असतो. या काळात महाराष्ट्रात वादळांमुळे अनियमित पाऊस पडण्याची शक्यता असते.

Yellow alert issued for 'these' districts of Vidarbha from October 25 to 27! North-east monsoon will remain active till December
Vidarbha Rain: दक्षिण- पश्चिम मान्सून माघारी गेल्यानंतरही विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. उत्तर-पूर्व मान्सून डिसेंबरपर्यंत सक्रिय राहणार असल्याने या काळात विदर्भातील काही भागांत अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान अकोला, बुलढाणा, वाशिमसह संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मान्सूनमुळे पाऊस पडतो.
हा पाऊस अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे होतो. हा मान्सून प्रामुख्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण भारतात सक्रिय असतो. या काळात महाराष्ट्रात वादळांमुळे अनियमित पाऊस पडण्याची शक्यता असते. दक्षिण-पश्चिम मान्सून हा महाराष्ट्रातील पावसाचा मुख्य स्रोत आहे.
"उत्तर-पूर्व मान्सून प्रामुख्याने ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण भारतातील इतर राज्यांत सक्रिय असतो. तथापि, या काळात सक्रिय होणाऱ्या पाऊस प्रणालीमुळे विदर्भात अधूनमधून हलका पाऊस पडतो. यामुळे विदर्भात काही भागांत अधूनमधून पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे."
- डॉ. प्रवीण कुमार, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग