शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

अठरा एड्सग्रस्त जोडप्यांचा फुलला संसार

By admin | Updated: June 12, 2014 19:03 IST

एड्स म्हणजे मृत्यूचा सापळा. या सापळ्यात अडकलेल्यांच्या जीवनात विवाह लावून जगण्याची उमेद निर्माण करण्याचे कार्य एड्सग्रस्तांनी एड्सग्रस्तांसाठी उभारलेली एनएपी संस्था करीत आहे.

अकोला : एड्स म्हणजे मृत्यूचा सापळा. या सापळ्यात अडकलेल्यांच्या जीवनात विवाह लावून जगण्याची उमेद निर्माण करण्याचे कार्य एड्सग्रस्तांनी एड्सग्रस्तांसाठी उभारलेली एनएपी संस्था करीत आहे. या संस्थेने आतापर्यंत १८ एड्सग्रस्त जोडप्यांचे विवाह लावून त्यांचे संसार सुरू करून दिले आहेत.
एड्सग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना मानसिक आधार देण्यासाठी एड्सग्रस्त असलेल्या काही तरुणांनी अकोल्यात एनएपी, नेटवर्क ऑफ अकोला बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही ही संस्था २००७ साली सुरू केली. तेव्हापासून या संस्थेच्या माध्यमातून एड्सग्रस्तांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यातील विशेष उपक्रम म्हणजे विवाह लावण्याचा. समाजाचा एड्सग्रस्तांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हीनत्वाचा आहे. अशा एड्सग्रस्तांशी विवाह कोण करणार? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे एनएपी संस्थेने त्यांच्या विवाह लावून संसार सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला. संस्थेकडे जिल्ह्यातील ७० टक्के एड्सग्रस्तांची माहिती आहे. त्यांनी विवाह रजिस्टर तयार केले असून, त्यामध्ये विवाहयोग्य एड्सग्रस्तांची नावे, माहिती व परिचय पत्र गोळा केले आहेत. विवाह योग्य पुरुष व महिलेचा विवाह वयाचा आधार घेऊन लावून देण्यात येतो. विवाह लावताना जात, धर्म, पंथ, श्रीमंती, गरिबी याचा भेद केल्या जात नाही. संसर्गित लोकांमध्ये पती किंवा पत्नीचा एड्सच्या दुर्धर आजाराने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये नैराश्य, भीतीयुक्त वातावरण निर्माण होते. एकटेच आयुष्य जगावे लागले. अशा विधवा व विधुरांना मानसिक आधार देऊन स्वाभिमानी अर्थपूर्ण वैवाहिक जीवन जगण्याची प्रेरणा निर्माण करून त्यांचे विवाह संस्थेच्या माध्यमातून लावून देण्यात येतात. याकरिता संस्थेच्या अध्यक्ष शुभांगी खराटे, उपाध्यक्ष गौतम ढाले, सचिव गोपाल चव्हाण यांच्यासह सदस्य कार्यरत असतात.

** चार जोडप्यांना झाली सदृढ मुले
पती-पत्नी दोघेही एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्यावर त्यांनी शारीरिक संबंध ठेवताना व मातेने गर्भधारणेच्या वतीने योग्य औषधोपचार घेतल्यास निगेटिव्ह मुले होऊ शकतात. एनएपी संस्थेने लावलेल्या अठरा विवाहांपैकी चार जोडप्यांना चार निगेटिव्ह मुले झाली आहेत. त्यांना एड्स नसून, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे संस्थेचे सचिव चव्हाण यांनी सांगितले.