शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कल्याण केंद्रांना द्यावी लागणार बाह्य रुग्ण सेवा!

By admin | Updated: November 29, 2014 22:21 IST

कल्याण आयुक्ताचे अहवाल सादर करण्याचे निर्देश.

हर्षनंदन वाघ /बुलडाणाकामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आजाराचे निदान करण्यासाठी, राज्यातील सर्वच कामगार कल्याण केंद्रांमध्ये बाह्य रुग्ण सेवा सुरू होणार आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणे, तसेच त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि मानसिक उन्नती घडविण्याच्या उद्देशातून सुरू करण्यात आलेल्या कामगार कल्याण केंद्रांच्या माध्यमातून आता कामगारांची रुग्णसेवा करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. कामगार कल्याण केंद्रांच्या बाह्य रुग्ण सेवा केंद्रांच्या माध्यमातून चर्म रोग, अस्थिरोग, हृदयरोग, सामान्य आजार, मुत्र रोग, तसेच नाक, कान, घशाच्या आजारांसोबतच, मानसिक आजारांचेही अचूक निदान करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या कल्याण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, कामगार कल्याण केंद्रांचे अधिकारी कार्यालयात बाह्य रूग्ण सेवा देण्यासाठी उपाययोजना करीत आहेत.*अहवाल सादर करण्याचे निर्देश!कामगार कल्याण केंद्रांमध्ये कामगार आणि कामगार कुटुंबीयांसाठी बाह्य रुग्ण सेवा सुरू करण्यासाठी तात्काळ अहवाल सादर करण्याचे स्मरणपत्र राज्यातील सर्वच केंद्र आणि उप-केंद्रांना देण्यात आले आहेत. त्यासाठी शासकीय, तसेच खासगी डॉक्टरांचे पॅनल तयार करण्यात येणार असून, पॅनलमधील डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी विशेष मोबदलाही कामगार कल्याण केंद्रांकडून दिल्या जाणार आहे. वेळेवर व अचुक आजाराच्या निदानासाठीच हा उपक्रम राबविल्या जाणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीचे स्पष्ट निर्देश कल्याण आयुक्तांनी साहाय्यक कल्याण आयुक्तांना दिले आहेत.*ईएसआयसीला अपयशसध्या ह्यएम्प्लॉईज स्टेट इंश्युरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाह्ण (ईएसआयसी)च्या रूग्णालयांवर कामगार किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणी व उपचारांची जबाबदारी आहे. त्या रुग्णालयांमध्ये संबंधित तज्ज्ञ उपलब्ध नसल्यास, खासगी रूग्णालयातील तज्ज्ञांकडून उपचारासाठी पत्र, किंवा केंद्राचे कार्ड दिले जाते. खासगी तज्ज्ञ डॉक्टरांना कामगार कल्याण केंद्राकडून उपचाराचा खर्चही दिला जातो; मात्र अनेकदा ते तपासणी व उपचारास नकार देतात, असे अनुभव आहेत. त्यामुळेच कामगार कल्याण केंद्रांमध्ये बाह्य रूग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.*२३२ ठिकाणी मिळणार सेवाराज्यातील कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून एकूण २३२ ठिकाणी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी बाह्य रूग्ण विभाग सुरू होणार आहे. त्यामध्ये कामगार कल्याण विभागाचे तीन प्रकल्प, ११ कामगार कल्याण भवन, २0 ललित कला भवन, १५ कामगार कल्याण उप-केंद आणि तीन ग्रामीण व समिती तत्वावरील केंद्रांचा समावेश आहे.