कृषी विद्यापीठातील मजुरांचे कामबंद आंदोलन

By Admin | Updated: June 26, 2014 02:05 IST2014-06-26T01:58:07+5:302014-06-26T02:05:51+5:30

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील रोजंदार मजुरांनी बुधवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Workers' agitation movement of Agriculture University | कृषी विद्यापीठातील मजुरांचे कामबंद आंदोलन

कृषी विद्यापीठातील मजुरांचे कामबंद आंदोलन

अकोला : विविध मागण्यांसाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त संघटनेच्या नेतृत्वात कृषी विद्यापीठातील रोजंदार मजुरांनी बुधवार पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास विद्यापीठातील खरीप पेरणीही होऊ देणार नसल्याचा इशाराही रोजंदार मजुरांनी दिला आहे.
कृषी विद्यापीठातील रोजंदार ट्रॅक्टर चालकांना प्रतिदिवस ५00 रुपये व रोजंदार मजुरांना प्रतिदिवस ३५0 रुपये मजुरी देण्यात यावी, तसेच रोजंदारीत वाढ झाल्याच्या तारखेपासून थकबाकी देण्यात यावी, रोजंदार मजुरांना दर आठवड्यात वेतन मिळाले पाहिजे, ३0 वर्षे काम केलेल्या रोजंदार मजुरांना सेवेत कायम करण्यात यावे, ट्रॅक्टर चालकांची पदे भरताना अंतर्गत ट्रॅक्टर चालकांमधून भरावी, हंगामी मजुरांना बारमाही काम मिळावे, विद्यापीठाच्या काही संशोधन विभागात पाच दिवसांचा असलेला आठवडा सात दिवसांचा करण्यात यावा, नवीन प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्यात यावे, स्वेच्छेने काम सोडणार्‍या रोजंदार मजुरांना उपदानाची रक्कम तातडीने देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त संघटनेच्या नेतृत्वात विद्यापीठातील रोजंदार मजुरांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Web Title: Workers' agitation movement of Agriculture University