शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदायी अंतर्गत राज्यातील पावणेदोन लाखांवर महिलांच्या शस्त्रक्रिया

By admin | Updated: March 9, 2015 01:51 IST

कर्करोगासह हृदयरोग व किडनीच्या दीड लाख शस्त्रक्रिया.

सचिन राऊत / अकोला: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील १ लाख ७६ हजार ३२७ महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्करोग, किडनी, डायलिसीससह हृदयरोगाच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. २६ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ह्यआरोग्य अभियान पंधरवडाह्ण राबविण्यात आला. यानिमित्त महिलांवर केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियांची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना नोव्हेंबर २0१३ पासून नव्याने सुरू करण्यात आली. या योजनेत ८00 हून अधिक सेवांचा समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत राज्यातील १ लाख ७६ हजार ३२७ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या . यामध्ये ६२ हजार २१५ कर्करुग्ण आणि २६ हजार १0५ हृदयरुग्ण महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. किडनी विकार व डायलिसीसने त्रस्त २२ हजार ७९ महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. राज्यात विविध ठिकाणी अपघातात जखमी झालेल्या १0 हजार ६६४ महिला रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, त्यापाठोपाठ जनन व मूत्रमार्गाचे विविध आजार असलेल्या ८ हजार ६४५ महिलांवरही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यासोबतच ४६ हजार ६१९ महिला रुग्णांवर इतर आजारांसंदर्भात आवश्यक ठरलेल्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. महिला आरोग्य अभियान पंधरवड्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने ही आकडेवारी जाहीर केली असून, यापुढेही महिलांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.