शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिलांचा पुढाकार

By admin | Updated: November 22, 2014 01:52 IST

बाभूळगावातील दुकान हटविण्याची मागणी.

अकोला: बाभूळगाव जहाँगीर येथील देशी दारूचे व बीअरचे दुकान हटवून गावात दारूबंदी करण्यासाठी गावातील शेकडो महिलांनी पुढाकार घेतला आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास २५ ते ३0 महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांना निवेदन देऊन त्यांना गावातील दारूचे दुकान हटविण्याची मागणी केली. महिलांनी दिलेल्या निवेदनामध्ये गावातील देशी दारू व बीअरच्या दुकानामुळे युवक व पुरुषांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. या दारू दुकानामुळे गावातील अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दारूडे दारू पिऊन रस्त्यांवरून येणार्‍या-जाणार्‍या महिला, युवती व मुलींना अश्लील शिवीगाळ करतात. रस्त्यामध्ये उभे राहून अश्लील संवाद साधतात. दारूच्या दुकानासमोर अनेकदा वाद होऊन हाणामार्‍यासुद्धा होतात. यासंदर्भात ग्रामपंचायतकडे अनेकदा गावातील महिलांनी तक्रार करूनही ग्रामपंचायतने तक्रारीची दखल घेतली नाही. विशेष म्हणजे, दारूचे दुकान दररोज सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडण्यात येते आणि रात्री १२ वाजताच्या सुमारास बंद होते. एवढेच नाहीतर ड्राय डेच्या दिवशी दुकान उघडून अवैधपणे दारू विक्री करण्यात येते. देशी दारूच्या दुकानामध्येच बीअरची विक्री होत असल्याने गावातील तरुण मुलेसुद्धा व्यसनी बनत आहेत. त्यामुळे दारूचे दुकान गावातून त्वरित हटवून गावात दारूबंदी करावी, अशी मागणीही करण्यात आली.