शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांसह विहिरीत पडलेली महिला बचावली

By admin | Updated: November 29, 2014 22:30 IST

चिखली तालुक्यातील घटना; बालके दगावले.

चिखली (बुलडाणा): तालुक्यातील सवणा शिवारातील एका विहिरीवर २८ नोव्हेंबरच्या सायंकाळी दोन चिमुकल्यांसह पाणी पिण्यासाठी गेलेल्या महिलेची मुलगी विहिरीत पडल्याने तीला वाचविण्यासाठी महिलेने उडी घेतल्यानंतर मुलगाही पाण्यात पडला. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना उघडीस आल्याने ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढले मात्र या घटनेत दोन्ही बालके दगावल्याची भिती व्यक्त होत असून यापैकी ३ वर्षीय मुलीचे प्रेत बाहेर काढण्यात आले आहे तर दिडवर्षीय मुलाचा अद्याप शोध लागला नसून शोधकार्य सुरूच आहे.याबाबत सविस्तर असे की, सवणा येथील सौ.सविता कैलास काकफळे वय २६ वष्रे ही विवाहिता तीन वर्षीय मुलगी अश्‍विनी व दिड वर्षीय मुलगा योगेश या दोन चिमुकल्यांसह पुरूषोत्तम पवार यांच्या शेतातील विहिरीवर सायंकाळच्या सुमारास पाणी पिण्यासाठी गेली होती. यावेळी तिची मुलगी अश्‍विनी तोल जावून विहिरीत पडली असता तीला वाचविण्यासाठी महिलेने विहिरीत उडी मारली. दरम्यान विहिरीच्या काठावर असलेला मुलगा योगेश हाही पाण्यात पडला. रात्री अडीच वाजेच्या सुमारास शेतमालकाने विहिरीवरील पंप चालू केला तेंव्हा विहिरीत अडकून पडलेल्या सौ.सविता हिने आरडाओरड सुरू केली मात्र रात्रीच्या अंधारात महिलेचा आवाज ऐकून भेदरलेल्या शेतमालकाने गावात येवून घडलेला प्रकार सांगीतल्यानंतर गावकर्‍यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी विहिरीत अडकलेल्या सविता हिस बाहेर काढण्यात आले तर पाण्यावर तरंगत असलेले मुलीचे प्रेतही बाहेर काढण्यात आले. दरम्यान योगेश नामक मुलाचा विहिरीत शोध घेणे सुरू असून विहिरील पाणी उपसण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या घटनेत उपरोक्त महिला बचावली, मुलीचे प्रेत गवसले तर मुलाचा शोध लागला नसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी सुभाष उत्तम काकफळे यांच्या फिर्यादीवरून र्मग क्र.७/१४ कलम १७४ जा.फौ.नुसार आमस्मीक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास ठाणेदार राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भोई व हेकॉ भुसारी करीत आहेत.