शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यातून पळविलेली रक्कम २४ तासात परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:17 IST

अकाेला : कापशी येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या एका ग्राहकाच्या बँक खात्यातून ऑनलाईन पळविलेली ५५ हजार रुपयांची ...

अकाेला : कापशी येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये खाते असलेल्या एका ग्राहकाच्या बँक खात्यातून ऑनलाईन पळविलेली ५५ हजार रुपयांची रक्कम सायबर पाेलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीनंतर २४ तासात परत मिळवल्याची कारवाई शुक्रवारी करण्यात आली.

कापशी येथील रहिवासी प्रकाश पुंडलिक इंगळे रा. कापशी तलाव यांनी सायबर पाेलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कापशी येथील शाखेमध्ये खाते असून त्यामध्ये ९० हजार रुपयांची रक्कम हाेती. या बॅंक खात्याच्या रकमेतून मुलाचे विमान तिकीट काढल्यानंतर ते रद्द करून तिकिटाचे पैसे परत मिळण्याकरिता गुगलवर विमान कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर त्यांनी कॉल केला. यावेळी कस्टमर केअरच्या प्रतिनिधीने बॅंक अकाऊंटची तसेच एटीएमची माहिती विचारल्यानंतर त्यांनीही माहिती दिली. त्यानंतर खात्यातील ५५ हजार रुपयांची रक्कम परस्पर काढल्याचे त्यांना समजले. त्यांनी या प्रकरणाची तक्रार सायबर पाेलीस ठाण्यात केली. पाेलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तपास सुरू केल्यानंतर दाेन टप्प्यात ही रक्कम काढल्याचा शाेध घेतला. तसेच फ्लिपकार्ट य एरॉन पेला ही रक्कम वळती झाल्याचे पाेलिसांच्या लक्षात आले. सायबर पाेलिसांनी दाेन्ही कंपन्यांशी संपर्क साधून रक्कम परत करण्याच्या सूचना केल्यानंतर त्यांनीही प्रक्रिया पूर्ण करून रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सात ते २१ दिवसाच्या मध्ये ही रक्कम त्यांना परत मिळणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनखाली सायबर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस

निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक, दीपक सोळंके, अतुल अजने, गोपाल ठोंबरे, गणेश सोनोगे यांनी केली आहे.