शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन झोन’साठी हवा अकोलेकरांचा पुढाकार!

By admin | Updated: June 16, 2017 13:41 IST

अकोलेकरांनी शहरात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

तीन वर्षांची देखभाल दुरुस्ती; लाखो रुपयांची तरतूदअकोला: शहराच्या तापमानात दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता आणि चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अकोलेकरांनी शहरात वृक्षारोपणासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महापालिकेच्या ह्यग्रीन झोनह्णच्या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी नागरिकांनी समोर येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. महापालिका क्षेत्रात टोलेजंग इमारती, लक्झरीयस सदनिका उभारण्याच्या नादात वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली. गल्ली-बोळांसह सर्व्हिस लाइनमध्येदेखील सिमेंट काँक्रिटीकरणाला प्राधान्य देण्यात आल्याचा परिणाम शहराच्या वातावरणावर झाला. सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांमुळे उन्हाळ्य़ातील उकाडा असह्य होत चालला आहे. यावर कायम स्वरूपी उपाय म्हणून शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने ह्यअमृतह्णयोजनेंतर्गत ह्यग्रीन झोनह्णनिर्माण करण्यासाठी मनपाकरिता ४ कोटींच्या निधीची तरतूद केली. ह्यग्रीन झोनह्णचा उद्देश सफल होण्यासाठी मनपाला किमान ५0 हजार चौरस फूट पेक्षा अधिक जागेची आवश्यकता आहे. अशा जागांचा मनपाकडून शोध घेतला जात असून, जागेसाठी अकोलेकरांना आवाहन करण्यात आले आहे. ज्या जागा निश्‍चित झाल्या, त्यांचा प्रकल्प अहवाल (डीपीआर)तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तीन वर्षांची देखभाल दुरुस्ती५0 हजार चौरस फूट किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असणार्‍या जागेवर ह्यग्रीन झोनह्णउभारण्याची संकल्पना आहे. त्यामध्ये जागेला तारेचे कुंपण उभारणे, सावली देणार्‍या मोठय़ा वृक्षांचे रोपण करणे, हिरवळ निर्माण करणे, शोभीवंत झाडे लावणे, वयोवृद्धांसाठी बसण्यास बेंच, पाण्याची सुविधा, चौकीदाराची खोली, पथदिव्यांची सुविधा निर्माण करण्याचा समावेश आहे. तीन वर्षांपर्यंत देखभाल दुरुस्ती करण्याच्या बदल्यात मनपाने संबंधित ह्यग्रीन झोनह्णवर लाखो रुपयांची तरतूद केली आहे. वातावरणावर होईल परिणामह्यअमृतह्णयोजनेंतर्गत शासनाने ह्यग्रीन झोनह्णसाठी केलेली आर्थिक तरतूद पाहता केवळ वृक्ष लागवड करणे हा उद्देश नसून, त्याचे संगोपन करण्याचे निकष ठरवून देण्यात आले आहेत. ही संकल्पना शहरात पहिल्यांदाच राबवल्या जात असल्याने अकोलेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शहराच्या विविध भागात निर्माण केल्या जाणार्‍या ह्यग्रीन झोनह्णमुळे पर्यावरणासह शहराच्या वातावरणात निश्‍चितच सकारात्मक परिणाम पहावयास मिळतील,असा जाणकारांना आशावाद आहे. शहराला हिरवेगार करून आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अकोलेकरांनी समोर येण्याची गरज आहे. ह्यग्रीन झोनह्णनिर्माण करण्यासोबतच आपल्याला शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करायचे आहे. याकरिता स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालयांसह वृक्षप्रेमींनी पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा. -अजय लहाने,आयुक्त मनपा.