शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीव धोक्यात

By admin | Updated: January 11, 2015 00:32 IST

बुलडाणा-खामगाव मार्ग बंद करण्याची मागणी : मोताळा, पिंपळगावराजा असा होऊ शकतो पर्यायी मार्ग.

सिद्धार्थ आराख /बुलडाणा चार तालुक्यातील २0 हजार ३५६.६0 हेक्टर असा विस्तीर्ण परिसर व्यापलेल्या जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यजीवाला धोका निर्माण झाला आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातून बुलडाणा -खामगाव हा राज्य मार्ग क्र. २४ जात असून या मार्गावर वाढलेल्या वाहतुकीमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाबरोबरच रात्रीच्या वेळी भरधाव वाहनाची धडक लागून वन्यप्राण्यांना जिवाला मुकावे लागत आहे. या मार्गावर वर्षभरात वाहनांच्या अपघातात दोन मादी बिबटला आपले प्राण गमवावे लागले. शेकडो प्राणीही वाहनाचे बळी ठरत आहेत.बुलडाणा जिल्ह्यात अंबाबरवा, लोणार आणि ज्ञानगंगा अशी तीन अभयारण्ये आहेत. यापैकी ज्ञानगंगा अभयारण्याची व्याप्ती सार्वाधिक आहे. चिखली, खामगाव, बुलडाणा आणि मोताळा असे तीन तालुक्यात हे अभयारण्य व्यापलेले असून २१ बिट, ९६ कक्ष, ७ वर्तुळ आणि २१ नियत क्षेत्र या अभयारण्यात आहे. मौल्यवान वनसंपदेबरोबरच बिबट, अस्वल, कोल्हा, लांडगे, निलगाय, काळवीट, हरिण, रानमांजर यासह अन्य प्राणी या जंगलात वास्तव्यास आहेत. जवळपास १५ ते २0 किमी मार्ग हा अभयारण्यातून जातो. अलीकडे या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर छोट्या वाहनांबरोबरच जड वाहतूक वाढली आहे. वाहनाच्या कर्कश आवाजामुळे प्राण्यांची शांतता भंग होते. वायुप्रदुषणामुळे प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. शिवाय रात्रीच्या वेळी भटकंती करत हे प्राणी जंगलाच्या बाहेर पडून रस्त्यावर येतात. या रस्त्यावरून जाणार्‍या भरधाव वाहनाची धडक लागल्याने त्यांचा हकनाक बळी जातो. मागील जानेवारी २0१४ रोजी याच मार्गावर मादी बिबटला वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते गतप्राण झाले होते. यावर्षी ९ जानेवारी रोली पुन्हा एक बिबट ठार झाले. विशेष म्हणजे वाहनाच्या अपघाताचे बळी ठरलेले हे दोन्ही मादी बिबट गर्भवती होते. याशिवाय वर्षभरात रानमांजर, हरिण, काळवीट, कोल्हे, लांडगे, अस्वल यासह दुर्मीळ शेकडो प्राणी रस्त्यावर येऊन अपघाताचे बळी ठरत आहेत; मात्र शासनाचा वन्यजीव विभाग याकडे डोळेझाक करीत आहे.