शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

होलसेल औषध व्यावसायिकांचा हात आखडता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:28 IST

औषध देण्यासाठी केवळ दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ दिल्याने शेकडो रुग्णांना आवश्यक तसेच महत्त्वाची औषधी मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

- सचिन राऊतअकोला: कोरोनाच्या भीषण संकटामुळे राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी औषध दुकाने २४ तास उघडे ठेवण्याचा आदेश असतानाही जिल्ह्यातील होलसेल औषध व्यावसायिकांनी किरकोळ औषध व्यावसायिकांना औषध देण्यासाठी केवळ दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ दिल्याने शेकडो रुग्णांना आवश्यक तसेच महत्त्वाची औषधी मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. होलसेल औषध व्यावसायिकांनी आॅर्डर घेण्यासाठी दुपारपर्यंतच वेळ दिल्याने अन्न व औषध प्रशासनाचे त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे यावरून दिसून येत आहे.कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे गंभीर संकट रोखण्यासाठी आरोग्य आणि औषध विभागावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे औषध दुकाने आणि हॉस्पिटल २४ तास उघडे ठेवण्याचा आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. यासोबतच औषधांची गरज हजारो रुग्णांना असतानाही अशा गंभीर आरोग्याच्या संकटावेळी औषध दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत; मात्र अकोल्यातील दवा बाजार तसेच होलसेल औषध विक्रेते, किरकोळ औषध विक्रेत्यांची आॅर्डर घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेकडो रुग्णांना औषधीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. अशातच गत दोन दिवसांपासून होलसेल औषध व्यावसायिकांनी किरकोळ व्यावसायिकांच्या आॅर्डर घेण्यासाठी दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ दिली आहे. या वेळेनंतर किरकोळ औषध व्यावसायिकांना औषधी लागल्यास होलसेल औषध विक्रेते औषध देण्यास असमर्थता दर्शवित आहेत. त्यामुळे किरकोळ औषध विक्रेत्यांकडे येत असलेल्या अनेक रुग्णांना औषधीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियंत्रण असलेल्या औषध व्यावसायिकांनी अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतरही औषध प्रशासन विभाग मात्र झोपेत असल्याचे दिसून येत आहे.मुंबईत परवाना निलंबनाची कारवाईमुंबईत जे औषध व्यावसायिक वेळ ठरवून औषधांची दुकाने सुरू ठेवत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत; मात्र अकोल्यातील होलसेल औषध विक्रेते शासनाचा आदेश तुडवित केवळ दुपारी २ वाजतापर्यंत वेळ ठरवून औषध देत असल्याने अत्यावश्यक सेवेत खंड करीत असल्याचे दिसून येत आहे. यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालावे!किरकोळ औषध व्यावसायिकांना होलसेल औषध व्यावसायिक दुपारी २ वाजतानंतर औषध देत नसल्याने हजारो रुग्णांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे किरकोळ औषध दुकानांमध्ये आता औषध नसल्याने तसेच सकाळी ११ ते दुपारी २ याच वेळेत होलसेलर्सकडून औषध मिळत असल्याने अनेक औषध दुकानांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे.रात्रीच्या रुग्णांचे हालखेड्यापाड्यांतून तसेच शहरातील रात्री-बेरात्री इमरजन्सीमध्ये रुग्णालयात दाखल होत असलेल्या रुग्णांना काही औषधी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. किरकोळ औषध व्यावसायिकांकडे हा पुरवठाच आता योग्य होत नसल्याने रुग्णांचे हाल-बेहाल होत आहेत. औषध प्रशासन विभागाचे अधिकारीही यावर नियंत्रण मिळवित नसल्याने नागरिकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाmedicineऔषधं