शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम वर्‍हाडात अघोषित नोटाबंदी; एटीएममध्ये ठणठणाट!

By admin | Updated: May 9, 2017 19:50 IST

अकोला, बुलडाणा व वाशिम या पश्‍चिम वर्‍हाडाच्या पट्टय़ातील एटीएममध्ये ठणठणाट आहे.

अकोला : अकोला, बुलडाणा व वाशिम या पश्‍चिम वर्‍हाडाच्या पट्टय़ातील एटीएममध्ये ठणठणाट आहे. गेल्या महिनाभरापासून एटीएममध्ये रक्कमच नसल्याने ग्राहकांची प्रचंड ससेहोलपट होत आहे, तर दुसरीकडे बँकाही केवळ दोन ते पाच हजारापर्यंतच विड्रॉल देत असल्याने ग्राहकांच्या व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. तीनही जिल्हय़ात विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांची जवळपास १५00 च्यावर एटीएम आहेत. नोव्हेंबर महिन्यात केंद्र शासनाने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच एटीएम बंद पडले होते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊन सर्वच एटीएम सुरू होऊन पैशांची चणचणही राहिली नाही; परंतु गेल्या महिनाभरापासून शहरातील राष्ट्रीयीकृत व खासगी एटीएममध्ये पैशांची प्रचंड चणचण आहे. रिझर्व्ह बँकेकडून मागणीनुसार पुरेशा प्रमाणात रोकड मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे बँकांच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. केवळ बोटावर मोजणारे एटीएम सुरू असतात; मात्र त्यामध्ये रक्कम टाकताक्षणीच अवघ्या तासाभरात संपून जात आहे. या प्रकारामुळे दैनंदिन व्यवहार करण्यासाठी लागणारी रोकड ग्राहकांना उपलब्ध होत नाही. कॅशलेस सुविधाच नाही मे महिन्यामध्ये अनेक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले आहेत. सध्या सर्वत्र लग्नाची धूम आहे; मात्र एटीएममध्ये ठणठणाट आहे, तर बँकाही आवश्यक तेवढे पैसे देत नाही. दुसरीकडे किराणा व कापडाच्या दुकानातही स्वाइप मशीन न लागल्यामुळे कॅशलेस व्यवहार करणे ग्रामीण भागातील नागरिकांना शक्य होत नाही. परिणामी, बहुतांश व्यवहार ठप्प पडले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयापासून रिझर्व्ह बँकेने पूर्वीप्रमाणे मुबलक कॅश देणे बंद केले आहे. जास्तीत जास्त ऑनलाइन व कॅशलेस व्यवहार व्हावेत, हा शासनाचा उद्देश आहे. त्यामुळे बँकांकडे पैसेच येत नाहीत. त्यामुळेच एटीएममध्येही पैसे नाहीत, अशी माहिती लिड बँकांच्या अधिकार्‍यांनी दिली.