शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेल रेल्वे स्थानकावर पाणीच पाणी

By admin | Updated: July 21, 2015 01:11 IST

पावसाने केली पोलखोल; अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तारांबळ.

अकोला : मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून ओळख असलेल्या अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ आणि २ वरील छताची अनेक ठिकाणी तुटफूट झाली आहे. सोमवारी दुपारी झालेल्या पावसाचे पाणी थेट या फलाटांवर बरसल्याने दोन्ही फलाटांवर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. पावसाळय़ासाठी विशेष नियोजन करणार्‍या रेल्वे प्रशासनाची यामुळे पोलखोल झाली आहे. मध्य रेल्वेमार्गावरील ह्यअह्ण श्रेणीच्या दर्जा असलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये अकोला रेल्वे स्थानकाची गणना होते. मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून ओळख असलेल्या या रेल्वे स्थानकाची वर्षभरात कोटींच्या घरात आवक असली तरी या ठिकाणी सुविधांचा मात्र कायम अभावच दिसून येतो. एक आणि दोन नंबरच्या फलाटांवरील शेडची तुटफूट झाली असल्याने बर्‍याच ठिकाणी छताला मोठमोठी छिद्रे पडली आहेत. परिणामी पावसाचे पाणी थेट फलाटांवर पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने स्थानिक प्रशासनाची पोलखोल केली. पावसाचे पाणी थेट फलाटावर बरसल्याने एक नंबर फलाटावर गाड्यांची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. पाण्यामुळे फलाटावर घसरण निर्माण झाल्याने गाडी येताच जागा धरण्यासाठी डब्याच्या दिशेने धाव घेणार्‍या अनेक प्रवाशांनी फलाटावर लोटांगण घातले. इतर प्रवाशांनादेखील फलटांवर हातातील सामान घेऊन चालणे कठीण झाले होते. रेल्वे स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयासमोरच व बुक स्टॉलसमोर बरसणार्‍या पावसामुळे धारा लागल्या होत्या. याव्यतिरिक्त फूड प्लाजा, उपअधीक्षकांच्या कार्यालयासमोर पाऊस थांबल्यानंतरही पाणी वाहत होते. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरवर्षी पावसाळय़ाच्या सुरुवातीला रेल्वे प्रशासनाच्यावतीने रेल्वे स्थानकाच्या डागडुजीसाठी विशेष खर्च केला जातो; मात्र सोमवारी बरसलेल्या पावसाने रेल्वे प्रशासनाची पोलखोल केली आहे.