शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भातील फळबागांवर पाणीटंचाईचे संकट!

By admin | Updated: May 5, 2015 00:05 IST

धरणं, भूगर्भपातळीत घट ; संत्रा, लिंबू, भाजीपाला पिके धोक्यात.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील सर्वच धरणांची जलपातळी खालावली असून, विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळीही घसरली आहे. त्यामुळे फळ पिकांना पाणी मिळणे कठीण झाल्याने जवळपास एक लाख हेक्टरवरील फळ पिके धोक्यात आली आहेत.मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे, जलसाठे ओव्हरफ्लो झाली होती. यामुळे यावर्षी शेतकरी निश्‍चिंत होता; परंतु जमिनीतील पाण्याची हवी तेवढी सरासरी वाढली नव्हती, परिणामी विहिरी, कूपनलिकांची पातळी झपाट्याने घसरली आहे. पडलेला पाऊस वेगाने वाहून गेल्यामुळे जमिनीचे हवे तेवढे पुनर्भरण झाले नाही. या सर्व परिस्थितीची झळ भाजीपाला व फळ बागायतदार शेतकर्‍यांना सोसावी लागत आहे.अकोला जिल्हय़ात सर्वाधिक ३,१५0 हेक्टरवर संत्रा आहे. दुसर्‍या क्रमांकावर २३00 हेक्टर लिंबू असून, केळी २२५0 हेक्टरवर आहे. मोसंबी १५ हेक्टर, पेरू १५२, डाळिंब २५0, चिकू ७५, सीताफळ ७५,आवळा ९0 तर आंबा ६२५ हेक्टर आहे. गेल्या दोन वर्षात शेतकर्‍यांनी फळ पिकांचे क्षेत्र वाढविले आहे; परंतु उद्भवणार्‍या पाणीटंचाईमुळे शेतकरी हतबल झाला आहे. जिल्हय़ातील लिंबाची देशभरात ओळख आहे. परप्रांतात जाणारे येथील लिंबू पाणीटंचाईसह अनेक संकटाचा सामना करीत आहे. आताच पाण्याची पातळी घसरली आहे. येणार्‍या पावसाळ्य़ात पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे फळे उत्पादक शेतकरी आतापासूनच चिंतेत आहे.