शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांवर जलसंकट

By admin | Updated: December 24, 2014 01:16 IST

महान येथील ‘एसीबी’ जळाला; पाणीपुरवठा ठप्प.

अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील एअर सर्किट ब्रेकर (एसीब ी) शॉर्ट सर्किट झाल्याने जळाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. येत्या दोन दिवसांत अकोलेकरांना पाणीपुरवठा होणार नसल्याची परिस्थिती आहे.महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर नवीन एअर सर्किट ब्रेकर बसविण्यासाठी तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांनी ५0 लाखांची तरतूद केली होती. १७ वर्षांमध्ये प्रथमच जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक दुरुस्तीसाठी भारिप-बमसंच्या कार्यकाळात निधीची तरतूद करण्यात आली. यामधून नवीन एसीबी बसविण्यात आले. मंगळवारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे एसीबी जळाल्याची घटना घडली. यावेळी काही कर्मचारी बालबाल बचावले. एसीबी जळाल्याने पाण्याचा उपसा करण्याची प्रक्रिया बंद झाली. यामुळे शहराला किमान दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याची तूर्तास स्थिती आहे. एसीबी जळाल्यामुळे पाण्याचा उपसा करणे शक्य नाही. दुरुस्तीसाठी अवधी लागेल. दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होईल. अकोलेकरांनी सहकार्य कर ण्याचे अवाहन जलप्रदाय विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील काळे यांनी लोक मतशी बोलताना केले. *अन् पम्पिंग मशीनचा तिढा सुटलाच नाही!४मे २0१४ मध्ये आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली होती. त्यावेळी पाण्याचा उपसा करणार्‍या पाचपैकी चार पम्पिंग मशीन कालबाह्य झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. एका मशीनसाठी किमान ४५ ते ५0 लाखांचा खर्च अपेक्षित असल्याने दोन नवीन पम्पिंग मशीन बसवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आयुक्तांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. याकरीता आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तात्काळ एक कोटीचा प्रस्तावही सादर केला. या प्रस्तावाचे पुढे काय झाले, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून कालबाह्य झालेल्या पम्पिंग मशीनचा तिढा कायमच असल्याचे चित्र आहे.