शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

 शाळांमध्ये रंगली मतदार जागृती रंगभरण स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 2:32 PM

हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन चित्रांमध्ये रंग भरले आणि मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा निवडणूक अधिकारी व शिक्षण विभागाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मतदार जागृती रंगभरण स्पर्धा शनिवारी शाळांमध्येच घेण्यात आली. लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर आयोजित स्पर्धा ही पावसामुळे रद्द करून शाळा-शाळांमध्ये घेण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन चित्रांमध्ये रंग भरले आणि मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के मतदान व्हावे. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि कुटुंबामध्ये मतदान करण्याविषयी आग्रह धरावा. यासाठी ही रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. शहरातील मोठी उमरीतील डवले पब्लिक स्कूल, प्रभात किड्स स्कूल, भारत विद्यालय, महाराष्ट्र माध्यमिक शाळा, बालशिवाजी शाळा, जागृती विद्यालय, डॉ. हेडगेवार माध्यमिक शाळा, स्कूल आॅफ स्कॉलर्स, समता विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, जिजाऊ कन्या शाळा, ज्युबिली हायस्कूल, होलीक्रॉस कॉन्व्हेंट, समर्थ पब्लिक स्कूल, सर्वोदय विद्यालय, शिवाजी हायस्कूल, मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालय, प्राजक्ता कन्या विद्यालय, नोएल कॉन्व्हेंट आदी शाळांमधील विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेत सहभाग घेतला.कलाध्यापक संघाच्यावतीने उपलब्ध करण्यात आलेल्या चित्रांमध्ये विद्यार्थ्यांनी रंग भरले. रंगभरण स्पर्धेदरम्यान शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, देवेंद्र अवचार यांच्यासह निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी दिल्या. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीSchoolशाळा