शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

vidhan sabha 2019 : भाजपच्या प्रतिष्ठेची अन् काँग्रेस, ‘वंचित’च्या अस्तित्वाची लढाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 3:14 PM

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता भाजप-सेनेची युती कायम राहिली तर पाचही मतदारसंघांत तिरंगी लढतीचे चित्र दृष्टीस येते.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघांत विजय मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची तर काँग्रेस आघाडी व वंचित बहुजन आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई असणारी निवडणूक आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता भाजप-सेनेची युती कायम राहिली तर पाचही मतदारसंघांत तिरंगी लढतीचे चित्र दृष्टीस येते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेने राजकारणाचे चित्रच बदलून गेले. या लाटेचा प्रभाव विधानसभा निवडणुकीतही कायम रहिला व अकोल्यात पाचपैकी चार जागांवर कमळ फुलले. बाळापूरची एक जागा भारिपने जिंकली व अकोला पूर्वची जागा अवघ्या २ हजार ४४० मतांनी गमावली. या पृष्ठभूमीवर आगामी निवडणूक ही अतिशय चुरशीची ठरणार असून, युती, आघाडी व वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना प्रत्येक मतदारसंघात ठरलेला असल्याने परंपरागत मतांचे विभाजन थांबविण्यात विरोधक यशस्वी झाले तर निकालांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

युतीच्या जागा वाटपाचे त्रांगडेभाजप-शिवसेना युतीसंदर्भात दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक असले तरी सेनेने दोन मतदारसंघांवर केलेला दावा मान्य झाला तर भाजपच्या एका आमदाराला मतदारसंघ सोडावा लागणार आहे. जर एकच जागा दिली तर ती बाळापूरची असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जर सेनेला बाळापूर दिले तर शिवसंग्राम या मित्रपक्षाला कुठे संधी देणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे जोपर्यंत युतीवर शिक्कामोर्तब होऊन जागा वाटप जाहीर होत नाही, तोपर्यंत सर्वच इच्छुक ‘गॅस’वरच राहतील.काँग्रेस आघाडीला भोपळा फोडण्याची संधीअकोल्यातील पाचही मतदारसंघांत काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसची कामगिरी अतिशय सुमार राहिली आहे. गत दोन दशकांपासून काँग्रेसला एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. बाळापूर मतदारसंघातून १९९९ ला विजयी झालेले लक्ष्मणराव तायडे हे काँग्रेसचे तर २००४ मध्ये मूर्तिजापूर मतदारसंघातून तुकाराम बिडकर हे राष्टÑवादी काँग्रेसचे शेवटचे आमदार. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस एकसंधपणे आव्हान पेलण्यास सज्ज होत असल्याने त्यांना भोपळा फोडण्याची संधी आहे.

बंडखोरी होण्याची सर्वच पक्षांना भीतीयुतीमध्ये जागा वाटपात असलेल्या मर्यादा लक्षात घेता अकोट, मूर्तिजापूर व बाळापूर या मतदारसंघांत इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची भीती दोन्ही पक्षांना आहे. दुसरीकडे आघाडीमध्ये राष्टÑवादीला दोन मतदारसंघ मिळण्याची शक्यता वर्तविली जात असून, त्यामध्ये अकोला पश्चिम या मतदारसंघाचा समावेश असल्याने येथील काँग्रेसच्या इच्छुकांकडून बंडाचा झेंडा फडकेल, अशीही चर्चा आहे.

‘होम पिच’वर ‘वंचित’ची परीक्षाअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राजकीय राजधानी समजल्या जाणाºया अकोल्याने त्यांना राजकीय रसद पुरविली आहे. लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड.आंबेडकरांना यश मिळाले नसले तरी विधानसभा निवडणुकीमध्ये अकोल्याने त्यांच्या शिलेदारांची पाठराखणच केली आहे. गत विधानसभेत एक आमदार विजयी करून त्यामध्ये सातत्य ठेवले आहे. त्यामुळे यावेळी ‘वंचित’च्या माध्यमातून इतर पक्षांची पडझड करण्यापेक्षा विजयाचे गणित सोडविण्याची परीक्षा त्यांच्या समोर राहणार आहे.

आ. भारसाकळे सहाव्यांदा तर सावरकरांना प्रथमच संधीअकोल्यातील विद्यमान आमदारांमध्ये आमदार प्रकाश भारसाकळे व आमदार गोवर्धन शर्मा हे सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. भारसाकळे यांनी अमरावती जिल्ह्यातून पाच वेळा व एकदा अकोटमधून असा सहाव्यांदा विधानसभेत प्रवेश केला आहे. आ. शर्मा हे सलग पाच वेळा विजयी झाले आहेत. २०१४ च्या निवडणुकीत अकोला पूर्व मतदारसंघातून रणधीर सावरकर यांनी पहिलीच निवडणूक जिंकली, तर आ. बळीराम सिरस्कार व आ. हरीश पिंपळे हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी