शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ टेनीस बॉल क्रिकेट संघात वाशिमचा डंका!

By admin | Updated: September 20, 2014 00:47 IST

वाशिम जिल्ह्यातील १३ खेळाडूंचा समावेश; आठ खेळाडू रिसोड तालुक्याचे.

शिखरचंद बागेरचा/वाशिमविदर्भ टेनीस बॉल क्रिकेट संघाच्या निवडीत वाशिमचा डंका वाजला आहे. वाशिम जिल्ह्याच्या तब्बल १३ खेळाडूंचा विदर्भाच्या संघात समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये रिसोड तालुक्यातील एकट्या हराळ गावचे आठ खेळाडू आहेत, हे विशेष.विदर्भ टेनीस बॉल क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड होण्याचा बहुमान हराळ येथील संदीप सरकटेला मिळाला आहे. २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान लखनौ येथील के. डी. सिंग बाबू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑल इंडीया अँण्ड इंटरनॅशनल टी- २0 टेनीस बॉल क्रिकेट कॅश फाईन मनी टुर्नामेंटमध्ये विदर्भाचा संघ सहभागी होणार आहे. त्यामध्ये विदर्भाच्या संघाकडून निवड झालेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. नागपूर येथील विदर्भ टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी राजकूमार कैथवास यांनी विदर्भ संघाची घोषणा केली आहे. त्यामध्ये हराळ येथील संदीप सरकटेचा कर्णधार म्हणून समावेश आहे. निवड झालेल्या इतर खेळाडूंमध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील प्रशांत खैरे, याच तालुक्यातील हराळ येथील महादा अंभोरे, सागर सरकटे, विठ्ठल गव्हाणे, मुरलीधर बागडे आणि नवनाथ भिंगे, वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील सुनिल फूकरे, वाशिम येथील अविनाश परळकर, पंचाळा येथील सत्यपाल इंगोले, कोयाळा येथील विठ्ठल शिंदे, विळेगाव येथील अजय वाकूडकर, तसेच शेलगाव इंगोले येथील शुभम इंगोले या खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे व्यवस्थापक म्हणून रविकूमार वानखेडे रिसोड यांची, तर कोच म्हणून राजेंद्र सौदागर यांची निवड करण्यात आली आहे. विदर्भ टेनीस बॉल क्रिकेट संघाची धूरा पहिल्यांदाच वाशिम जिल्ह्याच्या खांद्यावर आली आहे. या संधीचे सोने करुन वाशिम जिल्ह्यातील खेळाडू आपले नाव उंचावतील, असा विश्‍वास क्रिकेटप्रेमी व्यक्त करीत आहेत. लखनौ येथे २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान होणार्‍या टेनिस बॉल क्रिकेट टी-२0 स्पर्धेचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या स्पोर्ट चॅनलवर होणार असल्याने, या खेळाडूंना प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळाणार आहे.