शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

हरभ-याची भाजी मुंबईच्या मॉलमध्ये

By admin | Updated: December 9, 2014 00:02 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी निवडला व्यवसाय : दररोज होते लाखोंची उलाढाल

बुलडाणा : पावसाअभावी यावर्षी खरिपाचा हंगाम हातचा गेला, तर रब्बी हंगामातही राम उरला नाही. ग्रामीण भागातील शेतमजुरांच्या हाताला आतापासूनच काम नाही. त्यामुळे काही मजुरांनी शक्कल लढवून हरभर्‍याची भाजी थेट मुंबईला नेऊन विकण्याचा व्यवसाय हाती घेतला आहे. या तून दोन पैसे हातात येतात व कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. जिल्ह्यातून मुंबईच्या बाजारात गेलेली हीच भाजी आकर्षक पॅकिंग होऊन मॉलमध्ये विकली जाते. यातून दररोज लाखोची उलढाल होत आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा ही दोन पिके हमखास घेतली जातात. पाणी नसले तरी हरभरा पीकये ते. त्यामुळे कोरडवाहू जमिनीतही शेतकरी हरभरा पिक घेतात. हरभरा उगवल्यावर काही दिवसानंतर हरभर्‍याच्या झाडांचे शेंडे खुडावी लागतात. शेंडे खुडले की, झाडाच्या इतर फांद्यांची वाढ होऊन झाडे डेरेदार बनते. खुडलेले शेंडे कोवळे असल्यामुळे त्याची भाजी चवदार लागते. शेतकरी मजूर लावून ही भाजी खुडून घेतात. या हरभर्‍याच्या भाजीच्या विक्रीतून दोन पैसे जादा यावेत म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील काही महिलांनी या भाजीला मुंबईचे मार्केट दाखविले आहे. शेतकर्‍यांचा माल रात्रीच्या रेल्वेने मुंबईला न्यायचा. दिवसभर भाजीबाजारात ही भाजी विकायची आणि पुन्हा सायंकाळी रेल्वेत बसून दुसर्‍या दिवशी परत गावी यायचे. असे या व्यवसायाचे स्वरूप आहे. सध्या काही खेडे विभागातून मजूर हा व्यवसाय करीत आहेत. या भाजी व्यवसाया तून एक महिलेस दिवसाकाठी किमान हजार ते बाराशे रुपये मजुरी मिळत आहे. साधारण आठ ते पंधरा दिवसांचा हा व्यवसाय आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी हा व्यवसाय करीत असून, यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.