शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हाईट कोल’मध्ये कुटाराचा वापर

By admin | Updated: July 23, 2014 00:56 IST

चाराटंचाईत भर, पशुपालकांनी काढली जनावरे विक्रीला

अकोला: यावर्षी मान्सून लांबल्याने, येत्या काही दिवसांत सार्वत्रिक दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात चाराटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच 'व्हाईट कोल' मध्ये होणारा विविध प्रकाराच्या कुटाराच्या वापरामुळे चाराटंचाईत भर पडणार आहे. यावर्षी पावसाळा सुरू होऊन, दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नाही. मान्सून लांबल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या लांबणीवर पडल्या. तसेच पावसाअभावी जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठय़ातही वाढ झाली नाही. परिणामी पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. गेल्या सहा दिवसांपासून अधून-मधून रिमझिम पावसाने हजेरी सुरू केल्याने जिल्ह्यात खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस अद्यापही झाला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात सार्वत्रिक दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईसह चाराटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात लहान-मोठय़ा जनावरांसह २ लाख ७७ हजार ८८१ पशुधनाची संख्या आहे. या पशुधनासाठी सध्या जिल्ह्यात १ लाख ६६ हजार २६१ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हा चारा जुलै अखेरपर्यंत पुरणार आहे; परंतू तोपर्यंत सार्वत्रिक दमदार पाऊस न आल्यास जिल्ह्यात चाराटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पशुधनासाठी चार्‍याची गरज भासणार असतानाच, जिल्ह्यातील ह्यव्हाईट कोलह्णमध्ये होणारा कुटाराचा वापर चाराटंचाईत भर टाकणारा ठरणार आहे. व्हाईट कोल तयार करण्यासाठी कडबा कुट्टी, तूर,गहू, हरभरा, सोयाबीनचे कुटार, शेंगदाण्याची टरफले, पर्‍हाटी-तुराटीच्या लहान काड्या, लाकडाचा भुसा इत्यादींचा वापर केला जातो. व्हाईट कोल निमिर्तीसाठी व्हाईट कोल युनिटकडून वर्षाकाठी जवळपास ८00 ते १ हजार मेट्रिक टन कुटार व शेतातील काडीकचरा खरेदी केला जातो. त्यानुषंगाने आणखी काही दिवस सार्वत्रिक दमदार पाऊस न आल्यास निर्माण होणार्‍या चाराटंचाईच्या परिस्थितीत व्हाईट कोल तयार करण्याकरिता वापरण्यात येणारे कुटार, कुट्टी, शेतातील पालापाचोळा, शेंगदान्याची टरफले जनावरांच्या चार्‍यासाठी उपयोगात येऊ शकते. त्यामुळे व्हाईट कोलसाठी त्याचा होणारा वापर टंचाईच्या परिस्थितीत थांबविण्यासंदर्भात शासनामार्फत उपाययोजना करण्याची गरज आहे.