केंद्रीय मंत्री मेघवाल यांची हकालपट्टी करा

By Admin | Updated: June 22, 2014 01:55 IST2014-06-22T01:55:14+5:302014-06-22T01:55:35+5:30

अकोला महिला कॉँग्रेसची मागणी

Union Minister Meghwal's expulsion | केंद्रीय मंत्री मेघवाल यांची हकालपट्टी करा

केंद्रीय मंत्री मेघवाल यांची हकालपट्टी करा

अकोला : महिला अत्याचाराचा आरोप असलेले केंद्रीय मंत्री निहालचंद मेघवाल यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी महानगर महिला कॉँग्रेस कमेटिने केली आहे. या मागणीसाठी महिला कॉँग्रेस कमेटिने शुक्रवारी स्वराज्य भवनसमोर आंदोलन केले. महिलांनी पीडित महिलेला संरक्षण देऊन हा खटला जलदगती न्यायलयात चालविण्याची मागणी महिला कॉँग्रेस कमेटिने केली आहे. आंदोलनात महानगर महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती देशमुख, डॉ. मनिषा अमिराणी, सुमन भालदारे, अरूणा पंड्या, सुनिता धुंरधर, पूनम चव्हाण, आशा कोपेकर, संगिता आत्राम आदी सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Union Minister Meghwal's expulsion